आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धा : पुण्याच्या चार जणींना सुवर्णपदक | पुढारी

आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धा : पुण्याच्या चार जणींना सुवर्णपदक

पुणे : पुढारी वृत्तसेवा

आशियाई पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पुण्यातील चार महिलांनी 24 सुवर्णपदके जिंकली. यामध्ये 66 वर्षीय लॉरेन मोरे आणि 46 वर्षीय ज्योती भाडेकर यांनी आठ, तर नीता मेहता आणि श्रुतिका राऊत यांनी प्रत्येकी चार सुवर्णपदके मिळवली.

पुणे महापालिका : प्रारुप प्रभाग रचनेतील बदलांना मुहर्त मिळाला

ही स्पर्धा तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथे पार पडली. आशियाई मास्टर्स पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत तळेगावच्या लॉरेन मोरे (66) आणि पुण्याच्या ज्योती भाडेकर (46) यांनी भारतासाठी प्रत्येकी आठ सुवर्णपदके जिंकली. मोरे आणि भाडेकर यांनी पुण्याच्या जी 99 फिटनेस अकादमीतर्फे महिलांच्या संघाचे नेतृत्व करीत भारतासाठी 24 सुवर्णपदके जिंकली आहेत. 165 किलो वजन उचलणार्‍या मोरे यांना 60 + वयोगटातील आशियातील सर्वांत बलवान महिला म्हणून गौरवण्यात आले. इतर पुण्याच्या महिलांमध्ये नीता मेहता आणि श्रुतिका राऊत यांचा समावेश आहे.

Ross Taylor : न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटर रॉस टेलरची निवृत्तीची घोषणा

याबाबत प्रशिक्षक गिरीश बिंजवे म्हणाले, ‘लॉरेन मोरे गेल्या तीन वर्षांपासून खूप कठोर प्रशिक्षण घेत आहेत. तळेगाव ते पुणे आणि परत प्रशिक्षणासाठी दररोज 60 किमी प्रवास करण्यासाठी दृढनिश्चय आवश्यक आहे. ज्योती भाडेकर या चार वर्षांपासून प्रशिक्षण घेत आहेत आणि त्या गृहिणी असल्या तरी त्यांची इच्छाशक्ती प्रचंड आहे. त्यांचा मुलगा ओंकार हा त्यांचा मोठा आधार आहे.’

हेही वाचा

जम्मू- काश्मीरमधील दोन चकमकीत ६ दहशतवाद्यांचा खात्मा, तर एक जवान शहीद

अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीचे आरोपपत्र दाखल

स्ट्राँग पासवर्ड, गोपनीय ओटीपीनेच फसवणूक थांबणार!

Baba Vanga : बाबा वंगा यांची भविष्यवाणी कधी खरी ठरली आहे का? २०२२ साठी केली होती मोठी भविष्यवाणी

सर्वाधिक भ्रष्टांच्या यादीत घनी, असद, अर्दोगान

Back to top button