

डेहराडून : उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भारताचा यष्टिरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंतवर (Rishabh Pant) एक खास जबाबदारी सोपवली आहे. रविवारी त्यांनी ऋषभ पंत उत्तराखंडचा 'ब्रँड अॅम्बेसीडर' असेल अशी घोषणा केली. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विटवर हिंदीतून लिहिले की, 'भारतीय क्रिकेट संघातील एक अव्वल खेळाडू, तरुणांचा आदर्श आणि उत्तराखंडचा लाल ऋषभ पंत याला आमच्या सरकारने राज्याचा 'ब्रँड अॅम्बेसीडर' केले आहे.
खेळाकडे वळण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य जपायला प्रवृत्त करण्यासाठी ऋषभ पंत राज्यातील तरुण पिढीला प्रवृत्त करेल.' विशेष म्हणजे ऋषभ पंत (Rishabh Pant) हा मूळचा उत्तराखंडचाच आहे. 'ब्रँड अॅम्बेसीडर' घोषित केल्यानंतर पंतने मुख्यमंत्री पुष्कर धामी यांचे आभार मानले. त्याने उत्तराखंडचा 'ब्रँड अॅम्बेसीडर' म्हणून उत्तराखंडमध्ये खेळ आणि सार्वजनिक आरोग्याबाबत जागृती आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
तो म्हणाला की, 'मी माझ्या परीने हा संदेश देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. तुम्ही फिट इंडियासाठी अशी पावले उचलत आहात याचा आनंद आहे.'
हे ही वाचा :