‘सौरव गांगुली’ चे मौन विराट कोहलीच्या कारकिर्दीसाठी धोक्याचे संकेत आहेत का? | पुढारी

'सौरव गांगुली' चे मौन विराट कोहलीच्या कारकिर्दीसाठी धोक्याचे संकेत आहेत का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील दोन दिवसांपासून भारतीय क्रिकेट मध्ये नाट्यमय घडामोडी घडत आहेत. विराट कोहलीने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली वरच थेट कमेंट केली आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.

पाण्यात राहून मगरीचा द्वेष करू नये, असे म्हणतात. विराट कोहलीनेही तेच केले असेल. कोणत्याही खेळाडूला संघात किंवा संघाबाहेर काढू नका. तो कर्णधाराचा विशेषाधिकार म्हणून घ्या. पण त्यानंतरच्या गोष्टींचे काय? रोहितसोबतचे मतभेद, अश्विन-रहाणे-पुजारासोबतचे शीतयुद्ध अजूनही ठीक होते, पण कोरोनानंतर आयपीएल 2021खेळण्यास नकार देणे. नंतर आयसीसी ट्रॉफीही न मिळाल्याने विराटच्या अडचणी वाढल्या आहेत. हळूहळू विराट कोहली भारतीय क्रिकेट बोर्डाच्या नजरेतून उतरत आहे.

वाद हा इतिहासात पहिल्यांदाच

भारतीय टीमचा कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष यांच्यातला वाद हा इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. मी कोणतेही जाहीर वक्तव्य करणार नाही असं कोलकातामध्ये सौरव गांगुलीने स्पष्ट केले. पुढ गांगुली यांनी म्हटलं की, ‘कोणतेही वक्तव्य नाही, पत्रकार परिषद नाही. आम्ही ते हाताळू, या प्रकरणाला बीसीसीआयवर सोडून द्या. असंही त्यानं म्हटले. बुधवारी जे काही घडले त्यावर बीसीसीआयमधील कोणीही खूश नाही, पण त्यांना समजले आहे की त्यांची कोणतीही तीव्र प्रतिक्रिया हे प्रकरण ताबडतोब सोडवण्यासाठी हानिकारक असू शकते.

कर्णधार आणि अध्यक्ष एकत्र बसून सामंजस्याने मतभेद मिटवावेत. तूर्तास गांगुली किंवा शाह कर्णधाराशी बोलण्याची शक्यता कमी आहे. एखाद्या केंद्रीय कराराच्या खेळाडूने संस्था किंवा पदाधिकाऱ्यांविरुद्ध टीकात्मक कमेंट करणे अपेक्षित नाही, पण काय झाले या प्रश्नावर कोहलीचे उत्तर हे नियमांचे उल्लंघन आहे की नाही, हा पण एक प्रश्नच आहे.

बुधवारी जे काही झाले त्यावर बीसीसीआय मधील कोणीही खूश नसल्याचे बोलले जात आहे. पण यावर कोणतीही प्रतिक्रिया लगेच देणार नसल्याचे म्हटले आहे. बीसीसीआय या समस्येला तोंड देण्यासाठी पर्यायांचा विचार करत आहे. महत्त्वाच्या कसोटी मालिकेपूर्वी मैदानाबाहेरील नाट्यमय घडामोडींमुळे संघाचे लक्ष विचलित होणार नाही याचीही ते काळजी घेतील.

कोहलीमुळे बोर्डाचे कोट्यवधींचे नुकसान

कोहलीमुळे बोर्डाचे करोडोंचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे. आयपीएल विराट कोहलीमुळे युएई मध्य खेळवली. याचा अतिरिक्त खर्च बोर्डाला सोसावा लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही भारतात आयपीएल सुरू होते. बायो-बबल असूनही, कोरोनाचे रुग्ण वाढत होती. केकेआरविरुद्धच्या सामन्यापूर्वी दोन खेळाडूंचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते, त्यानंतर विराटने सामना खेळण्यास नकार दिला होता. नंतर, हळूहळू सर्व फ्रँचायझी मालकांनी त्यांच्या संघ आणि खेळाडूंच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. यानंतर बीसीसीआयने 4 मे रोजी आयपीएल पुढे ढकलले, नंतर ते यूएईमध्ये खेळवण्यात आली. तेव्हापासून बोर्ड कोहलीवर नाराज झाले.

हेही वाचलत का?

Back to top button