Shane Warne's accident : शेन वाॅर्नचा अपघात; पायाला मोठी दुखापत | पुढारी

Shane Warne's accident : शेन वाॅर्नचा अपघात; पायाला मोठी दुखापत

पुढारी ऑनलाईन डेस्क

ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध फिरकीपटू शेन वाॅर्न याच्या बाईकचा अपघात (Shane Warne’s accident) झाला आहे. या अपघातात त्याचा मुलगा जेसनदेखील होता. मेलबर्न येथे दोघेजण बाईकवरून प्रवास करत होते. यामध्ये त्याच्या पायाला आणि घोट्याला दुखापत झाली आहे.

या अपघातात ५२ वर्षाच्या शेन वाॅर्नला (Shane Warne’s accident) आणखी काही दुखापत झालेली असून पायाचा घोटा तुटल्याची भीती शेन वाॅर्नने व्यक्त केलेली आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाच्या वृत्तानुसार शेनची बाईकची ही जवळपास १५ मीटरपर्यंत फरफटत गेली आहे.

अपघातानंतर उपचार घेण्यास नकार दिला. पण, आज सकाळी रुग्णालयात गेला. कारण, त्याला खूप वेदना होऊ लागल्या होत्या. शेन वाॅर्न म्हंटलं की, “माझा बाईकवरून अपघात झाला. सुरुवातीला मी ठीक असल्याचं वाटलं. पण, आज सकाळी मला त्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे रुग्णालयात गेलो आहे.”

“सध्या माझ्या घोट्याला खूप यातना होत आहेत. मी आशा करतो की, मला मुका मार लागला असेल. बाईक माझ्या पायावर पडली होती. त्यात माझा पाय मोडला नसावा”, असंही क्रिकेटपटू शेन वाॅर्ननं म्हंटलं आहे.

हे वाचलंत का ?

Back to top button