‘आयपीएल’चे 15 वे सत्र 2 एप्रिलपासून? | पुढारी

‘आयपीएल’चे 15 वे सत्र 2 एप्रिलपासून?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ‘आयपीएल-2022’च्या सत्राचा कार्यक्रम जवळजवळ निश्चित केला आहे. बीसीसीआयने याची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी पहिला सामना 2 एप्रिल रोजी खेळविला जाऊ शकतो. मात्र, सलामी सामन्यात विद्यमान विजेता सीएसके खेळणार की नाही, हे अद्याप निश्चित नाही.

‘आयपीएल’चे 15 वे सत्र भारतातच आयोजित करण्यात येईल, असे बीसीसीआयकडून यापूर्वी सांगण्यात आले आहे. कोरोनामुळे ‘आयपीएल’चे 14 वे अर्धे सत्र संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविण्यात आले होते. अंतिम सामना 4 किंवा 5 जूनला दरम्यान, 2022 च्या सत्राचा अंतिम सामना 4 अथवा 5 जून रोजी आयोजित केला जाऊ शकतो.

यावेळी 8 ऐवजी 10 संघ सहभागी होतील. दोन नव्या संघांची भर पडल्याने सामन्यांची संख्याही वाढणार आहे. आता 60 ऐवजी 74 सामने होतील. सहभागी संघ प्रत्येकी 14-14 सामने खेळतील. संघांना यातील 7 घरच्या तर 7 सामने बाहेरच्या मैदानावर खेळावे लागतील.
डिसेंबरमध्ये लागणार बोली 2022 च्या आयपीएल सत्रासाठी खेळाडूंची बोली डिसेंबरमध्ये लागणार आहे.

दरम्यान, संजीव गोयंका ग्रुपने लखनौला 7,090 कोटींना तर सीव्हीसी कॅपिटलने 5200 कोटी रुपयांना अहमदाबादचा संघ खरेदी केला आहे. या दोन्ही संघांच्या माध्यमातून बीसीसीआयने 12000 कोटींची कमाई केली. जी अपेक्षेपेक्षा जास्त आहे.

भारतातच होणार आयोजन

आयपीएलचे आगामी सत्र भारतातच आयोजित केले जाईल, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी यापूर्वीच घोषित केले आहे. चेन्नईत बोलताना ते म्हणाले होते की, ‘आगामी सत्र भारतातच आणि ते अत्यंत रोमांचक होईल. मेगा ऑक्शन लवकरच येत असून, दोन नवे संघही सहभागी झाले आहेत. यामुळे ही स्पर्धा आता अधिक अटीतटीची होईल.’

हेही वाचलं का?

Back to top button