रोहित शर्मा ट्रेंट बोल्टला म्हणाला, मी सांगितलेली ट्रीक माझ्याविरुद्धच वापरलीस | पुढारी

रोहित शर्मा ट्रेंट बोल्टला म्हणाला, मी सांगितलेली ट्रीक माझ्याविरुद्धच वापरलीस

जयपूर : पुढारी ऑनलाईन

रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धचा बुधवारी खेळला गेलेला सामना जिंकला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि फलंदाज सूर्यकुमार यादव यांनी मोलाची कामगिरी बजावली. सामना संपल्यावर trent boult. सामन्यात असे नेमके काय घडले की रोहितने दिलेली ट्रिक ट्रेंट बोल्टने रोहित विरुद्धच वापरली.

टी२० वर्ल्डकप स्पर्धेत निराशाजनक कमागिरी केल्यानंतर टीम इंडिया नवा कर्णधार रोहीत शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली प्रतिस्पर्ध्यांचा सामना करण्यासाठी पुन्हा सज्ज झाली आहे. सध्या न्यूझीलंडचा संघ भारतीय दौऱ्यावर आला असून ते भारताविरुद्ध ३ टी२० सामने व २ कसोटी सामने खेळणार आहेत. दरम्यान बुधवारी भारत व न्यूझीलंड दरम्यान पहिला टी२० सामना जयपूर येथे पार पडला. या अटीतटीच्या सामन्यात भारताने पाच गडी राखून न्यूझीलंडला पराभूत केले. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याने अवघ्या ३६ चेंडूत पाच चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

या सामन्यात सूर्यकुमार यादवने मोठी भूमिका पार पाडली. त्याने ४० चेंडूत ६२ धावांची खेळीकरत भारताला विजयासमिप पोहचवले. सूर्यकुमार यादवला सामनावीराने सन्मानीत करण्यात आले. त्याच सोबत गोलंदाज आर. अश्विन चांगली गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाचे दोन महत्त्वाचे बळी मिळवले. त्याच्या गोलंदाजीमुळे न्यूझीलंड संघ सरतेशेवटी मोठी धावसंख्या उभी करु शकला नाही.

या सामन्यातील रोहित आणि ट्रेंट बोल्ट यांच्या कामगिरीचा विचार केला. तर आक्रमक वाटणाऱ्या रोहित शर्मा याला ४८ धावांवर ट्रेंट बोल्ट याने बाद केले. ट्रेंट बोल्ट हा मुंबई इंडियन्स कडून रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळतो. दोघांनी एकमेकांसोबत भरपूर क्रिकेट खेळले आहेत. त्यामुळे दोघांनाही एकमेकांची बलस्थाने व कमजोर जागा नेमकेपणाने माहित आहेत.

सामना झाल्यावर रोहित शर्मा म्हणाला, ट्रेंट बोल्ट आणि मी एकत्र खूप खेळलो आहोत. त्यामुळे त्याला माझ्या कुमकुवत जागा चांगल्या प्रकारे माहित आहेत. मला देखिल त्याची बलस्थाने माहित आहेत. जेव्हा मी त्याचा कर्णधार असतो तेव्हा त्याला रिस्क घेऊन गोलंदाजी करायला सांगतो. आता तिच ट्रीक बोल्टने माझ्या विरुद्ध वापरली आहे. त्याने मिड विकेटच्या फिल्डरला मागे ढकलले. तसेच फाइनलेगच्या फिल्डरला जवळ बोलवले. मला माहित होते की आता तो बाउंसर टाकणार आहे. मी पूर्ण तयारी केली की आता हा चेंडू मिड विकेटच्या फिल्डरच्या वरुन फटकावायचा. पण, माझे दुर्भाग्य की चेंडू माझ्या अपेक्षापेक्षा खूपच स्लो आला.

Back to top button