मुंबई; पुढारी ऑनलाईन: अभिनेत्री सुष्मिता सेन ( sushmita sen ) आणि बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा यांच्या अफेअरची चर्चा एकेकाळी बाॅलीवूडमध्ये रंगली हाेती. सुरुवातीच्या काळात सुष्मिता आणि रणदीपने रिलेशनशिपबद्दल खुलेआमपणे बोलले नसले तरी नंतरच्या काळात मात्र, रणदीपने त्याच्यातील नात्याबद्दल खुलासा केला. यात त्याने जवळपास ३ वर्ष रिलेशनशिफमध्ये असून ही नाते फार काळ टिकले नसल्याचे त्यानं म्हटलं आहे.
सुष्मिता सेनसोबत ( sushmita sen ) ब्रेकअप झाल्यानंतर रणदीप हुड्डाचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. एवढेच नाही, तर सुष्मिता सेनचे करिअर उंचावत गेले. सुष्मिता आणि रणदीप दोघेजण पहिल्यांदाच 'कर्मा' आणि 'होली' या चित्रपटात एकत्रित स्पॉट झाले होते.
त्यानंतर रणदीप हुड्डा बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रसिद्धीच्या दिशेने वाटचाल करू लागले. त्यावेळी सुष्मिता सेन आणि रणदीप हुड्डा यांची रिलेशनशिपची चर्चा बी-टाऊनमध्ये खूपच झाली, पंरतु, दोघांचे नाते तुटले.
याच दरम्यान रणदीप आणि सुष्मिता पहिल्यांदाच एका चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांमध्ये जवळीकता वाढत गेली. याशिवाय दोघेही अनेक कार्यक्रमात एकमेकांसोबत स्पॉट झाले होते.
रणदीपने एका दिलेल्या मुलाखतीत सुष्मितासोबत जवळपास ३ वर्ष रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला आहे. यात त्याने म्हटले की, 'सुष्मितासोबत रिलेशनशिपमध्ये होतो, परंतु, आम्ही कधीही एकत्रित राहिलो नाही. सुष्मिताचे मुंबईतील वर्सोवा येथील घरी कधीतरी अधूनमधून तिला भेटायला जायचो. नात्यामध्ये अनेक गोष्टी चुकीच्या होतात.
जर तुमच्या नात्यात मजबूत बांधिलकी किंवा विवाह नसेल तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. त्याकाळी आमच्या नात्याची खुपच चर्चा झाल्याने प्रसिद्धी मिळाली. परंतु, याच दरम्यान आपल्या आयुष्यात स्वतःसाठी वेळ घालवणे किती महत्वाचे आहे हे समजल्याने तिच्याशी ब्रेकअप करावे लागले.'
सुष्मिता सेनने केवळ बॉलिवूड स्टार्स नव्हे तर, अनेक बिझनेसमॅन आणि स्पोर्ट्समॅन यांनाही डेट केले आहे. यात वसीम अकरम, शब्बीर भाटिया, डायरेक्टर मुद्स्सर अजीज यांचा समावेश आहे. सध्या ती बॉयफ्रेंड रोहमन शॉलला डेट करत आहे. दोघे अनेकदा कार्यक्रमात एकत्रित स्पॉट झाले आहेत. बॉयफ्रेंड रोहमन शॉल आणि सुष्मिताच्या मुलींसोबत इंन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर करत असतो.
हेही वाचलंत का?