England Vs Australia : ऑस्‍ट्रेलियाचा इंग्‍लंडवर ३३ धावांनी विजय | पुढारी

England Vs Australia : ऑस्‍ट्रेलियाचा इंग्‍लंडवर ३३ धावांनी विजय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात त्यांनी इंग्लंडवर 33 धावांनी विजय मिळवल्याने त्यांना उपांत्य फेरी जवळ आली आहे. (England Vs Australia) दुसरीकडे पाकिस्तानने न्यूझीलंडला हरवल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.

इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला 286 धावांत रोखले

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला 286 धावांत रोखले. , ख्रिस वोक्सने कागारूंच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. ट्रॅव्हीस हेड (11) व डेव्हिड वॉर्नर (15) यांच्या विकेटनंतर स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन यांनी तिसर्‍या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. नंतर आदील राशीदच्या फिरकीने कमाल केली. स्मिथ 44 धावांवर माघारी परतला. पाठोपाठ राशीदने जॉश इंग्लिसला (3) बाद केले. लाबुशेनची 71 धावांची खेळी मार्क वूडने संपुष्टात आणली. डेव्हिड विलीच्या चेंडूवर ग्रीनचा (47) त्रिफळा उडाला. लिएम लिव्हिंगस्टोनने स्टॉयनिसला (35) बाद केले. कर्णधार पॅट कमिन्सही (10) लगेच बाद झाला. अ‍ॅडम झम्पाच्या उपयुक्त 29 धावांमुळे ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 286 धावांपर्यंत मजल मारली.

England Vs Australia : इंग्‍लंडचा डाव २५३ धावांत संपुष्‍टात

परंतु, इंग्लिश फलंदाजांना या धावांचा पाठलाग जमला नाही. त्यांचा डाव 253 धावांत संपुष्टात आला. इंग्लंडकडून डेव्हिड मलान (50) आणि बेन स्टोक्स (64) यांनी अर्धशतके केली. मोईन अली (42), ख्रिस वोक्स (32) यांनी त्यांना हातभार लावला. परंतु, जॉनी बेअरस्टो (0), जो रूट (13) जोस बटलर (1) यांच्या अपयशाने इंग्लंडला सलग पाचव्या पराभवाच्या खाईत लोटले.

इंग्लंड संघ : जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (w/c), मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड

ऑस्ट्रेलिया संघ : डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (डब्ल्यू), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (सी), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड

Back to top button