ICC WC Tickets : आयसीसी वन-डे वर्ल्डकपचे तिकिट कसे बुक करावं? ही माहिती तुमच्यासाठी...

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाचा आयसीसी वन-डे वर्ल्डकप भारतामध्ये होणार आहे. ही स्पर्धा ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. आयसीसीने वन-डे वर्ल्डकपचे सुधारित वेळापत्रक आज (दि.९) जाहीर केले. यामध्ये बीसीसीआयला सुरक्षेच्या कारणास्तव ९ सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करावा लागला. (ICC WC 2023 Tickets)
यासोबत बीसीसीआयने वन-डे वर्ल्डकपच्या तिकीट विक्रीबद्दल ही माहिती दिली आहे. दि. १५ ऑगस्टपासून क्रिकेटप्रेमींना वर्ल्डकप सामन्यांची तिकीटे बुक करता येणार आहेत. (ICC WC 2023 Tickets)
तिकीट बुक करण्यापूर्वी चाहत्यांना https://www.cricketworldcup.com/register या वेबसाईटवर आपली नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणीदेखील दि. १५ ऑगस्टपासून आपल्याला करता येणार आहे. या वेबसाईटवर तिकीट विक्रीबाबतची सर्व माहिती मिळणार आहे. यामुळे आपल्याला स्पर्धेमधील सामने पाहण्यासाठी आणि स्टेडियममधील आपली जागा आरक्षित करण्यासाठी मदत होणार आहे.
वर्ल्डकपची इ – तिकीटे क्रिकेटप्रेमींना मिळणार नाहीत. असे बीसीसीआयने आधीच घोषणा केले आहे. सामने पाहण्यासाठी चाहत्यांना स्टेडियममधील तिकीट विक्री सेंटरवर प्रत्यक्ष जाऊन तिकीट घ्यावी लागणार आहेत. बीसीसीआयने आधी तिकीट आरक्षित करणाऱ्या चाहत्यांना तिकीटाची हार्ड कॉपी पाठवण्याची जबाबदारी बुक माय शो आणि पेटीयम यांच्याकडे सोपवली आहे.
हेही वाचा;
- Daily Walking and Health : उत्तम आरोग्यासाठी दररोज किती पावले चालले पाहिजे? जाणून घ्या अभ्यास काय सांगतो…
- Congress : काँग्रेसच्या महाराष्ट्रातील पदयात्रेची दोन नेत्यांवर जबाबदारी; ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात
- Wheat in open market : ५० लाख मेट्रिक टन गव्हाचा खुल्या बाजारात विक्रीचा केंद्राचा निर्णय
- Sanjay Raut : पवारांबद्दलच्या आदरामुळे पक्ष फोडला का? संजय राऊतांचा पीएम मोदींना खोचक टोला
- Ayushman Bharat: आयुष्मान भारत योजनेअंतर्गत फसवणूक रोखण्यासाठी सरकारकडून AI चा वापर! राज्यसभेत माहिती