Ayushman Bharat: आयुष्मान भारत योजनेअंतर्गत फसवणूक रोखण्यासाठी सरकारकडून AI चा वापर! राज्यसभेत माहिती | पुढारी

Ayushman Bharat: आयुष्मान भारत योजनेअंतर्गत फसवणूक रोखण्यासाठी सरकारकडून AI चा वापर! राज्यसभेत माहिती

पुढारी ऑनलाईन: भारत सरकार आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) अंतर्गत संशयास्पद व्यवहार आणि संभाव्य फसवणूक रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, असे मंगळवारी (दि.८) राज्यसभेत सांगण्यात आले. ‘PIB’ ने जारी केलेल्या नोटीसमध्ये यासंदर्भातील माहिती दिली आहे.

AI तंत्रज्ञानाचा वापर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आरोग्य सेवा फसवणूक रोखण्यासाठी, शोध घेणे आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी केला जात आहे. यामुळे पात्र लाभार्थ्यांना योग्य उपचार सुनिश्चित करण्यात मदत होणार आहे, असे आरोग्य राज्यमंत्री एसपी सिंह बघेल यांनी लेखी उत्तरात सांगितले आहे.

केंद्र सरकार आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय तंत्रज्ञान भागीदार AI/ML वापरून फसवणूक विरोधी उपायांचा विकास आणि उपयोजन करण्यात गुंतलेले आहे. तसेच १ ऑगस्ट २०२३ पर्यंत या योजनेअंतर्गत एकूण २४.३३ कोटी आयुष्मान कार्ड तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्र्यांनी सभागृहात दिल्याचे ‘पीआयबी’ने म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button