IPL 2023 MS Dhoni : धोनी गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त; पुढील सामना खेळणार का? | पुढारी

IPL 2023 MS Dhoni : धोनी गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त; पुढील सामना खेळणार का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच गुडघ्याच्या दुखापतीशी झुंज देत आहे, तो अद्याप बरा झालेला नाही. बुधवारी धोनीने शेवटच्या षटकात २१ धावांची गरज असताना संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते. पण, नंतर तो स्वत:च शेवटच्या चेंडूवर संघाला स्वप्नवत विजय मिळवून देण्यात कमी पडला. या पराभवानंतर सीएसकेचा मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग याने धोनीच्या दुखापतीची पुष्टी केली आहे.

फ्लेमिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “धोनी गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे, जे तुम्ही त्याच्या काही कृतीतून पाहू शकता. दुखापत त्याच्या खेळाला काही प्रमाणात रोखत आहे. त्याचा फिटनेस नेहमीच चांगला राहिला आहे. तो टूर्नामेंट सुरू होण्याच्या एक महिना आधी आला होता. तो एक महान खेळाडू आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. मात्र अद्याप फ्लेमिंग यांनी धोनी या दुखापतीनंतर यापुढील सामन्यांतून बाहेर जाणार का, याबाबत सांगितलेले नाही.

हेही वाचा : 

Back to top button