IPL 2023 Sandeep Sharma | धोनीला षटकार मारण्यापासून कसे रोखले? राजस्थानला विजय मिळवून देणाऱ्या संदीप शर्मानं सांगितली रणनिती

IPL 2023 Sandeep Sharma | धोनीला षटकार मारण्यापासून कसे रोखले? राजस्थानला विजय मिळवून देणाऱ्या संदीप शर्मानं सांगितली रणनिती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात सीएसकेला शेवटच्या षटकात 21 धावांची गरज असताना संदीप शर्माने केवळ 17 धावा दिल्या आणि राजस्थानला 3 धावांनी विजय मिळवून दिला. महेंद्रसिंह धोनीचे धडाकेबाज २ षटकार चेन्नईला विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन आलेच होते. पण राजस्थानचा युवा गोलंदाज संदीप शर्माने प्रचंड दडपणाखाली देखील, अजिबात खेळता येणार नाहीत असे ३ भेदक यॉर्कर टाकले आणि यामुळे राजस्थानला निसटता विजय मिळाला. सामन्यानंतर संदीपने भेदक यॉर्करवर धोनीला षटकार मारण्यापासून कसे रोखले, याबाबत सांगितले. (IPL 2023 Sandeep Sharma)

राजस्थानच्या विजयाबाबत बोलताना संदीप म्हणाला की, "मी धोनीसमोर माझे यॉर्कर्स योग्य लांबीवर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. मी चांगले यॉर्कर टाकले. मी माहीकडे हील्स यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करत होतो. पण यश मिळत नव्हते. याच कारणामुळे मी माझ्या गोलंदाजीची दिशा बदलली आणि विकेटसाठी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय माझ्यासाठी योग्य ठरला. धोनीने शेवटच्या षटकात दोन षटकार ठोकले, यावर संदीप म्हणाला की, येथे लेग साईड मोठी नाही. सुरुवातीला मला माझा चेंडू योग्य रेषेवर ठेवता आला नाही. त्यामुळे कमी फुल टॉस चेंडू पडला, ज्यावर माही भाईने दोन षटकार मारले. या विजयाने मी आनंदी आहे, असेही संदीप याने सांगितले.

धोनीने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले, तरीही…

शेवटच्या षटकात २१ धावांची आवश्यकता असताना संदीपने पहिले दोन चेंडू वाईड टाकले व ६ चेंडूत १९ धावा असे समीकरण झाले. त्यानंतर अधिकृत पहिल्या चेंडूवर धोनी एकही धाव घेऊ शकला नाही. त्यानंतर मात्र धोनीने सलग दोन षटकार खेचत खळबळ उडवून दिली. यातील पहिल्या लो फुलटॉसवर त्याने डीप फाईन लेगकडे तर दुसऱ्या लो फुलटॉसवर डीप मिडविकेटच्या दिशेने उत्तुंग षटकार खेचले. या दोन षटकारांनंतर ३ चेंडूंत ७ धावांची गरज असे समीकरण होते. मात्र, चौथ्या चेंडूवर धोनीला एकेरी धाव घेता आली तर २ चेंडूत ६ धावांची गरज असताना जडेजाला देखील एकच धाव घेता आली. यानंतर धोनी स्ट्राईकला आला आणि शेवटच्या चेंडूवर चेन्नईला विजयासाठी ५ धावांची गरज होती. यावेळीदेखील संदीपने संयम व एकाग्रतेवर भर देत बिनचूक यॉर्कर टाकला आणि धोनीला डीप मिडविकेटच्या दिशेने केवळ एकच धाव घेता आली. शेवटच्या षटकात २१ धावांची गरज असताना धोनीने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. पण, नंतर तो स्वत:च शेवटच्या चेंडूवर संघाला स्वप्नवत विजय मिळवून देण्यात कमी पडला.

लिलावात खरेदी न झाल्याने निराश झाला होता संदीप

जेव्हा संदीपला आयपीएल लिलावात विकत घेतले गेले नाही तेव्हा तो खूप निराश झाला होता. cricket. com शी बोलताना संदीप म्हणाला होता, "मला धक्का बसला आहे आणि निराश झालो आहे, मला कळत नाही की मी का विकलो गेलो नाही. मी ज्या ज्या संघासाठी खेळलो तेव्हा चांगली कामगिरी केली. खरं तर मला वाटलं की कोणाता तरी संघ माझ्यासाठी बोली लावेल. खरे सांगायचे तर मला हे अपेक्षित नव्हते. चुक कुठे आहे हे देखील कळत नाही. मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. रणजी ट्रॉफीच्या शेवटच्या फेरीत मी सात विकेट्स घेतल्या. सय्यद मुश्ताक अलीमध्ये मी खूप चांगली कामगिरी केली. तरीही मला बोली लागली नाही हे मला समजू शकत नाही. (IPL 2023 Sandeep Sharma)

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news