Jaydev Unadkat : जयदेव उनाडकटच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद | पुढारी

Jaydev Unadkat : जयदेव उनाडकटच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या १६ व्या हंगामाधल्या १५ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात सोमवारी (दि. १०) झाला. हा सामना बंगळूर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला. सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये २ बाद २१२ धावा केल्या. आरसीबीच्या आघाडीच्या फळीने तडाखेबाज खेळी करत अर्धशतके झळकावली. यावेळी लखनऊचा गोलंदाज जयदेव उनाडकट चांगलाच महागडा ठरला. सामन्यात त्याने आयपीएल इतिहासातील नकोसा विक्रम आपल्या नावावर केला. (Jaydev Unadkat)

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने घरच्या मैदानावर अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. पहिल्या सहा ओव्हरमध्ये विराट कोहलीने आक्रमक खेळी करत ३५ बॉलमध्ये अर्धशतक झळकावले. त्याने आपल्या खेळीत ६१ धावा चोपल्या. त्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांनी धावांचा झंझावत सुरूच ठेवला. दोघांनी मिळून गोलंदाजांना घामटा काढत अर्धशतके साजरी करत २०० धावांचा टप्पा पार केला. (Jaydev Unadkat)

लखनऊचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट सामन्यात महागडा ठरला. त्याने सामन्यात २ ओव्हरमध्ये त्याने २७ धावा दिल्या. पहिल्या ओव्हरमध्ये ४ तर दुस-या ओव्हरमध्ये १८ धावा दिल्या. १८ व्या ओव्हरमध्ये षटकार लगावल्यानंतर आयपीएल इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकला गेलेला तो गोलंदाज ठरला. त्याच्याविरुद्ध आतापर्यंत १६० षटकार लगावले आहेत. त्याच्यासोबत उमेश यादव याच्याविरुद्धही फलंदाजांनी इतके षटकार ठोकले आहेत. तसेच भुवनेश्वर कुमार विरुद्ध फलंदाजांनी ११५ षटकार लगावले आहेत.

हेही वाचा;

Back to top button