Kolkata vs Rajasthan : केकेआरच्या विजयाने मुंबईचे पॅकअप | पुढारी

Kolkata vs Rajasthan : केकेआरच्या विजयाने मुंबईचे पॅकअप

शारजाह : पुढारी ऑनलाईन

कोलोकाता नाईट राडयर्सने राजस्थान रॉयल्सचा ( Kolkata vs Rajasthan ) ८६ धावांनी पराभव करत प्लॅ ऑफमधील आपले स्थान पक्के केले. या सामन्याच्या निकालावर भविष्य अवलंबून असणाऱ्या मुंबई इंडियन्सला आता आयपीएलमधून आपला गाशा गुंडळावा लागणार आहे. उद्या त्यांचा सामना सनरायझर्स हैदराबाद बरोबर होणार आहे. जर मुंबईने हा सामना जिंकला तर त्यांचे आणि केकेआऱचे समान १४ गुण होतील. मात्र रनरेटच्या आधारवर केकेआर प्ले ऑफमध्ये दाखल होईल. केकेआरचे रनरेट अधिक ०.५८७ इतके आहे. तर मुंबईचे रनरेट उणे ०.०४८ इतके आहे.

कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स ( Kolkata vs Rajasthan ) यांच्यातील सामन्यात राजस्थानने ठेवलेल्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा डाव घसरला. पहिल्याच षटकात शाकिब अल हसनने फॉर्ममध्ये असलेल्या यशस्वी जयस्वालला शुन्यावर बाद केले. त्यानंतर संजू सॅमसनही १ धावांची भर घालून माघारी गेला.

पॉवर प्ले संपेपर्यंत राजस्थानने अजून दोन विकेट गमावल्या. लिव्हिंगस्टोन ( ६ ) आणि अर्जुन रावत ( ० ) दोघेही स्वस्तात बाद झाले. राजस्थानची वाताहत झाल्यानंतर शिवम दुबे आणि ग्लेन फिलिप्स यांनी डाव सारवण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवम मावीने त्यांना दोघांनाही सातव्या षटकात बाद करत राजस्थानची अवस्था ६ बाद ३४ अशी केली.

त्यानंतर आलेल्या ख्रिस मॉरिसनेही निराशा केली. तो चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता माघारी गेला. सात फलंदाज आत गेल्यानंतर राहुल तेवतियाने एकाकी झुंज देत ४६ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूने विकेट पडत गेल्या. तेवतियाच्या खेळीने राजस्थानने नामुष्कीजनक पराभव टाळला. अखेर राजस्थानचा डाव १६.१ षटकात ८५ धावात संपुष्टात आला. केकेआरने सामना ८६ धावांनी जिंकत प्ले ऑफमधील आपले स्थान निश्चित केले.

केकेआरकडून शिवम मावी आणि लोकी फर्ग्युसनने भेदक मारा केला. मावीने २१ धावात ४ तर फर्ग्युसनने १८ धावात ३ बळी टिपले.

तत्पूर्वी, आयपीएल २०२१ मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स ( Kolkata vs Rajasthan ) यांच्यातील सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरने राजस्थानसमोर १७२ धावांचे टार्गेट ठेवले. सलामीवीर शुभमन गिलने ( ५६ ) दमदार अर्धशतकी खेळी केली.

फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या केकेआरच्या सालमीवीरांनी संघाला सावध सुरुवात करुन दिली. व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिलने केकेआरला ७ षटकात ४४ धावांपर्यंत पोहचवले. पॉवर प्लेनंतर या दोघांनी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. या दोघांनी संघाला १० षटकात ७५ धावांपर्यंत पोहचवले. मात्र राहुल तेवातियाने व्यंकटेश अय्यरला बाद केले. त्यानंतर नितीश राणा आणि शुभमन गिलने भागीदारी रचण्यास सुरुवात केली.

शुभमन गिलचे दमदार अर्धशतक ( Kolkata vs Rajasthan )

मात्र ग्लेन फिलिप्सने राणाला १२ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. राणानंतर गिलने त्रिपाठीच्या साथीने केकेआरचे शतक १३ षटकात धावफलकावर लावले. दरम्यान, शुभमन गिलने आपले अर्धशतकही पूर्ण केले. मात्र अर्धशतकानंतर ख्रिस मॉरिसने त्याला ५६ धावांवर बाद केले.

दुसऱ्या बाजूने राहुल त्रिपाठीने अखेरची ५ षटके राहिली असल्याने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्याने आणि दिनेश कार्तिकने केकेआऱला १५० च्या जवळ पोहचवले. मात्र चेतन साकरियाने राहुल त्रिपाठीला २१ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. राजस्थान रॉयल्सच्या चेतन साकरिया आणि मुस्तफिजूर रहीमने टिच्चून मारा करत केकेआरला मोठे फटके मारण्यापासून रोखले. दरम्यान, कार्तिक आणि मॉर्गननने अखेरच्या षटकात १६ धावा करत केकेआरला २० षटकात ४ बाद १७१ धावांपर्यंत पोहचवले.

राजस्थानचे संघात चार बदल ( Kolkata vs Rajasthan )

राजस्थानने आपल्या संघात ४ बदल केले आहेत. लिव्हिंगस्टोन, मॉरिस, उनाडकट यांचा संघात समावेश केला आहे. तर केकेआरनेही आपल्या संघात एक बदल करून टीम साऊदीच्या जागी लोकी फर्ग्युसनला संघात घेतले आहे.

राजस्थान यापूर्वीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. त्यामुळे त्यांना काहीही गमावण्याचा धोका नाही. मात्र आजचा सामना जर केकेआरने गमावला तर त्यांचा प्ले ऑफचा समावेश जर तर वर अवलंबून राहील. जर राजस्थानने केकेआरचे टार्गेट ११ षटकात पूर्ण केले तर मुंबईचा रनरेटच्या आधारावर प्ले ऑफचा मार्ग प्रशस्त होईल. त्यामुळे मॉर्गनच्या नेतृत्वातील केकेआर विजयासाठी प्रयत्नशील असणार आहे.

Back to top button