Sourav Ganguly : गांगुलींची ‘दिल्ली’त दादागिरी! IPL मध्ये मिळाली मोठी जबाबदारी | पुढारी

Sourav Ganguly : गांगुलींची ‘दिल्ली’त दादागिरी! IPL मध्ये मिळाली मोठी जबाबदारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री घेतली आहे. त्यांची इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाच्या क्रिकेट संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर गांगुली (Sourav Ganguly) क्रिकेटशी संबंधित मोठ्या पदावर परतण्याची ही पहिलीच वेळ आहे. असे असले तरी या निर्णयाचे दिल्ली कॅपिटल्सने तपशीलवार स्पष्टीकरण जाहीर केलेले नाही.

गांगुली (Sourav Ganguly) यांनी यापूर्वी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्समध्ये काम केले आहे. ते 2019 मध्ये दिल्ली संघाचे मार्गदर्शक होते. यंदा मात्र त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. कारण दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने आयपीएल व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका लीग आणि दुबई क्रिकेट लीगमध्ये संघ खरेदी केले आहेत.

त्यामुळे ते दिल्ली कॅपिटल्स व्यतिरिक्त, या फ्रँचायझीशी संबंधित आयएलटी 20 (ILT20) संघ दुबई कॅपिटल्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या टी 20 लीग संघ प्रिटोरिया कॅपिटल्सशी संबंधित कामा पाहतील. याबाबत माहिती असलेल्या एका आयपीएलमधील सूत्राने गोपनीयतेच्या अटीवर ‘पीटीआय-भाषा’ला मोठा खुलासा केला आहे. सौरव या वर्षापासून दिल्ली कॅपिटल्ससोबत जोडले जातील. फ्रँचायझी आणि त्याच्यात याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गांगुलींनी याआधीही दिल्ली संघासोबत काम केल्याने त्यांचे आणि संघ मालकांमध्ये चांगली समज आहे. नुकत्याच झालेल्या मीनी लिलावात मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि गांगुली या दोघांनी केलेल्या सूचनेचे पालन फ्रँचायझीने केल्याचेही समजते, असेही सूत्राने स्पष्ट केले आहे.

ऑक्टोबर 2022 मध्ये गांगुली यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडले. दुसऱ्या टर्मसाठी मुदतवाढ न मिळाल्याने त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर तीन वर्षे राहिले असून आता ते पुन्हा आयपीएलमध्ये दिसतील.

हेही वाचा

Back to top button