Virat Kohli : विराट कोहली रचू शकतो इतिहास, मोडणार सचिन तेंडुलकरचा महाविक्रम!

Virat Kohli : विराट कोहली रचू शकतो इतिहास, मोडणार सचिन तेंडुलकरचा महाविक्रम!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा (team india) माजी कर्णधार विराट कोहलीसाठी (virat kohli) 2023 हे वर्ष खूप महत्त्वाचे असणार आहे. तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा शतकांचा (sachin tendulkar century) मोठा विक्रम मोडीत काढून नवीन वर्षात इतिहास रचेल अशी आशा तज्ज्ञांसह चाहत्यांना आहे.

गेल्या वर्षी, विराट कोहलीने (virat kohli) शतकांचा दुष्काळ संपुष्टात आणला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेतही चार अर्धशतके झळकावून त्याने 296 धावा फटकावल्या. तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणा-या फलंदाजांच्या यादीत अव्वल होता. 2022 मध्ये मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये धमाकेदार कामगिरी करणा-या कोहलीचा फॉर्म यंदा 2023 मध्येही कायम राहिल असा अनेकांनी विश्वास व्यक्त केला आहे.

वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावण्यात विराट कोहली (virat kohli) सचिन तेंडुलकरला ((sachin tendulkar) मागे टाकू शकतो. मात्र, सचिनचा विक्रम मोडण्यासाठी विराटला यंदा दमदार कामगिरी करावी लागणार आहे. वनडे क्रिकेटमध्ये 'मास्टर ब्लास्टर'च्या नावावर 49 शतके आहेत. तर 'रन मशिन'च्या खात्यात आतापर्यंत 44 शतके जमा झाली आहेत.

अशा परिस्थितीत विराट कोहलीने (virat kohli) यावर्षी आणखी सहा शतके झळकावली तर तो सचिनचा विक्रम मोडेल. सचिन तेंडुलकरने (sachin tendulkar) 463 एकदिवसीय सामन्यांच्या 452 डावांमध्ये 44.83 च्या सरासरीने आणि 86.24 च्या स्ट्राईक रेटने 18426 धावा केल्या. या दरम्यान त्याने 49 शतके आणि 96 अर्धशतके केली. सचिन तेंडुलकरची सर्वोच्च धावसंख्या 200 धावा आहे.

दुसरीकडे, विराटने आतापर्यंत 265 वन डे सामन्यांच्या 256 डावांमध्ये 57.47 च्या सरासरीने आणि 93.01 च्या स्ट्राइक रेटने 12471 धावा केल्या आहेत. त्याने 44 शतकांसह 64 अर्धशतके झळकावली आहेत. विराटची सर्वोच्च धावसंख्या 183 आहे. वन डे विश्वचषकही याच वर्षी होणार आहे. विराट कोहलीला यावर्षी अनेक 50-50 षटकांचे सामने खेळायला मिळणार आहेत. त्यामुळे विराटकडे सचिनचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news