Sania Mirza-Shoaib Malik Divorce : सानिया मिर्झा -शोएब मलिकचा घटस्फोट! मित्राने केला खुलासा | पुढारी

Sania Mirza-Shoaib Malik Divorce : सानिया मिर्झा -शोएब मलिकचा घटस्फोट! मित्राने केला खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Sania Mirza-Shoaib Malik Divorce) यांचे लग्न आता तुटण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये सातत्याने हा दावा केला जात आहे की, दोघे वेगळे होताहेत. पण या चर्चांना पूर्णविराम मिळाला, जेव्हा त्यांच्या जवळच्या एका मित्राचे वक्तव्य समोर आले. मीडिया रिपोर्ट्समध्येच, सानिया-शोएबच्या जवळच्या मित्राकडून बातमी आली आहे की, आता दोघेही लवकरच घटस्फोट घेणार आहेत. घटस्फोटाचा निर्णय फायनल झाला आहे. सध्या शोएब मलिक पाकिस्तानमध्ये आहे. तो एका स्पोर्ट्स चॅनेलसाठी टी-२० वर्ल्ड कपसाठी काम करत आहे. (Sania Mirza-Shoaib Malik Divorce)

सानिया मिर्झा दुबईत असल्याचे सांगण्यात आले आहे. सानियाने नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. यामुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. शुक्रवारी सानिया मिर्झाने मुलगा इझानसोबतचा एक गोंडस फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘मला सर्वात कठीण दिवसांतून घेऊन जाणारे क्षण. (he moments that get me through the hardest days 💙 @izhaan.mirzamalik)
त्याचवेळी, दुसऱ्या मीडिया रिपोर्टमध्ये शोएब मलिकच्या मॅनेजमेंट डिपार्टमेंटच्या एका सदस्याचा हवाला देत घटस्फोट झाल्याचे सांगण्यात आले आहे. या सदस्याने सांगितले की, सानिया आणि शोएबचा अधिकृतपणे घटस्फोट झाला आहे. दोघेही आता वेगळे झाले आहेत.

शोएब मलिकने सानिया मिर्झाची फसवणूक केली?

शोएब मलिक दुसऱ्या एका मुलीला डेट करत असल्याचं पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. त्यामुळे त्याच्या आणि सानियाच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतरच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. शोएबने त्याच्या एका टीव्ही शोमध्ये सानियाची फसवणूक केल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे. मात्र, या वृत्तावर दोघांनीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

शोएब मलिक आणि सानिया यांनी १२ एप्रिल, २०१० रोजी हैदराबादमध्ये लग्न केले होते. त्यानंतर लग्नाच्या दहा वर्षांनी त्यांचा मुलगा इझानचा जन्म झाला. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी नुकताच त्यांचा मुलगा इझान मिर्झा मलिकाचा वाढदिवस एकत्र साजरा केला. शोएब मलिकने त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. पण सानियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो पोस्ट केले नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

Back to top button