आळंदी : माउलींचा संजीवन समाधी सोहळा 17 पासून | पुढारी

आळंदी : माउलींचा संजीवन समाधी सोहळा 17 पासून

आळंदी; पुढारी वृत्तसेवा : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा लाखो भाविकांच्या भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. कोरोनानंतर निर्बंधमुक्त कार्तिकी वारी होणार असल्याने भाविकांनी अलंकापुरी दुमदुमल्याचे पाहावयास मिळणार आहे. यंदाच्या सोहळ्यात सुमारे आठ लाख भाविक येतील, असा अंदाज आहे. त्यानुसार सोयी-सुविधा पुरविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने भाविक येण्याची संख्या लक्षात घेता, आळंदी नगर परिषद, आळंदी देवस्थान कामाला लागले आहे.

पालिकेकडून तात्पुरती मोबाईल टॉयलेट उभारण्यात येणार आहेत. देवस्थानकडून नदीपलीकडे बारा-तेरा हजार भाविक एकाच वेळी रांगेत येऊ शकतील, या क्षमतेची दर्शन बारी उभारण्याचे नियोजन आहे. पालिकेकडूनदेखील यात्रेच्या अनुषंगाने विविध कामे सुरू करण्यात आले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा, कार्तिकी वारी दि. 17 ते दि. 23 पर्यंत परंपरेनुसार पार पडणार आहे. दि.17 रोजी रोजी हैबतबाबा पायरी पूजनाने सोहळ्याला सुरुवात होणार आहे. दि.20 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून, दि.22 रोजी समाधी सोहळा पार पडणार आहे. दि.23 नोव्हेंबर रोजी पालखी छबिना मिरवणुकीने सोहळ्याची सांगता होणार आहे.

 

 

 

Back to top button