टोकियो; पुढारी ऑनलाईन : टोकिया पॅरालिम्पिकमध्ये आज बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात कृष्णा नागरने इतिहास घडवला. पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कृष्णा नागर याने हाँगकाँगच्या शू मान कायशीचा पराभव करत सुवर्ण पदकावर मोहर उमटवली. पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताची ही आजवरची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल १९ पदकांवर आपले नाव काेरले आहे.
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आजही आपली विजयाची घाैडदाैड कायम ठेवली. पुरुष एकेरी बॅडमिंटन
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कृष्णा नागर दमदार प्रदर्शन करत हाँगकाँगच्या शू मान कायशीचा २-१ असा पराभव केला.
बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथिराज यांनी उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या फ्रेडी सेटियावानवर २१-९,२१-१५ असा विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.
यावेळी भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले होते.
अंतिम सामन्यात सुहास यथिराज यांनी फ्रान्सव्या ल्युकास मझूर याला कडवी झुंज दिली.
मझूर याने २१-१५, १७-२१ आणि १५-२१ असा सामना जिंकला.
बॅडमिंटन स्पर्धेत राैप्यपदकाला गवसणी घालणारे सुहास यतिराज हे गौतमबुद्ध नगरचे जिल्हाधिकारी आहेत.
पॅरालिम्पिकमध्ये पदक पटकावणारे ते पहिले आयएएस ठरले आहेत.
टोकिया पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत १९ पदकांवर मोहर उमटवली आहे.
या स्पर्धेतील ही आजवरची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.
हेही वाचलं का ?