Rohit Sharma Asia Cup: रोहितवर चाहते भडकले : म्हणाले, ‘हिटमॅन तुझ्या निवृत्तीची वेळ झाली’ | पुढारी

Rohit Sharma Asia Cup: रोहितवर चाहते भडकले : म्हणाले, ‘हिटमॅन तुझ्या निवृत्तीची वेळ झाली’

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Asia Cup 2022 : आशिया कप स्पर्धेला शनिवारपासून (27 ऑगस्ट) सुरुवात होणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या यूएईमध्ये आहे. येथे टीम इंडियाला रविवारी (28 ऑगस्ट) आशिया कप स्पर्धेचा पहिला सामना खेळायचा आहे. हा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी, टीम इंडिया गुरुवारी (25 ऑगस्ट) नेट सरावासाठी मैदानात उतरली होती. सरावानंतर रोहित शर्माचा एक वेगळेच बालिश रूप पाहायला मिळाले. तो ‘स्केटिंग स्कूटर’ चालवताना दिसला.

बीसीसीआयने शेअर केला रोहितच्या मजामस्तीचा व्हिडिओ

‘स्केटिंग स्कूटर’वरून रपेट मारण्याचा रोहित शर्माचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शेअर केला आहे. यासोबत बीसीसीआयने लिहिले की, ‘सरावानंतर रोहित शर्मा त्याच्या स्टाईलमध्ये स्विंग करताना दिसला.’ या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. काहींनी तर रोहित शर्माला ट्रोल करायला सुरुवात केली. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘रोहित तू पुन्हा दुखापतग्रस्त होऊ नकोस. तू क्वचितच एक किंवा दोन सामने खेळतोस आणि जखमी होतोस. आता ऋषभ पंतला कर्णधार करून तुझी निवृत्तीची वेळ आली आहे. तू आणि विराट कोहली युवा खेळाडूंचा मार्ग अडवत आहात.’ (Rohit Sharma Asia Cup)

रोहित शर्मावर मोठी जबाबदारी…

आशिया चषक स्पर्धा शनिवारपासून (27 ऑगस्ट) सुरू होत आहे. दुसऱ्या म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. यावेळी रोहित शर्मावर मोठी जबाबदारी असेल, कारण विराट कोहली सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. तो सतत मोठी धावसंख्या उभारण्यासाठी धडपडताना दिसत आहे, मात्र त्याला यश येत नाहीय. गेल्या जवळपास अडीच वर्षापासून तो शतकी खेळी करू शकलेला नाही. तसेच सहा महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावलेले नाही. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याच्यावर दबाव असेल असे अनेकांचे म्हणणे आहे. कोहलीने नुकताच एक महिन्याचा ब्रेक घेतला होता. (Rohit Sharma Asia Cup)

Back to top button