भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मोहम्मद सिराज आणि इंग्लंडच्या काही प्रेक्षकांमध्ये शाब्दिक देवाणघेवाण झाली. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा पारा चढलेला दिसला. या घटनाक्रमाबाबत विकेटकिपर ऋषभ पंतने दिवसाचा खेळ संपल्यानंतर माहिती दिली.
ऋषभ पंत म्हणाला, 'मला वाटते प्रेक्षकांमधून कोणीतरी सिराजच्या दिशेने चेंडू फेकला. त्यामुळेच कर्णधार विराट कोहली भडकला. तुम्हाला काय वाटते ते तुम्हा बोला मात्र क्षेत्ररक्षकाच्या अंगावर वस्तू फेकणे बरोबर नाही. मला वाटते हे क्रिकेटसाठी योग्य नाही.'
मोहम्मद सिराज हा भारतीय संघातला एक प्रमुख गोलंदाज आहे. त्याने दुसऱ्या कसोटीत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सिराज ऑस्ट्रेलियातही प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीचा शिकार झाला होता. सिडनी कसोटी दरम्यान प्रेक्षकांनी त्याला टार्गेट केले होते. त्यामुळे काही काळ खेळही थांबला होता.
त्यावेळी सिराजने पंचांकडे ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांनी त्याच्यावर अपमानास्पद टिप्पणी करण्यात आल्याची तक्रार केली होती. याचबरोबर विराट कोहली लॉर्ड्स टेस्ट दरम्यानही चांगलाच भडकला होता. कारण काही प्रेक्षकांनी केएल राहुलवर शॅम्पेन बॉटलचे कॉर्क फेकले होते.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : काबूल ग्राऊंड रिपोर्ट, तालिबान दहशत अनुभवलेला वालीजान पुढारी ऑनलाईनवर
https://youtu.be/64iOYYZztvo