‘विराट’ शिकारीत अँडरसन देतोय नॅथन लायनला टक्कर | पुढारी

'विराट' शिकारीत अँडरसन देतोय नॅथन लायनला टक्कर

लीड्स : पुढारी ऑनलाईन

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीत विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बऱ्याच काळानंतर विराट कोहलीने नाणेफेक जिंकल्याने टीम इंडिया आणि चाहतेही आनंदीत होते.

मात्र या आनंदावर जेम्स अँडरसनने विरजन टाकले. जेम्स अँडरसनने पहिल्यांदा लॉर्ड्स गाजवणाऱ्या भारताच्या शतकवीर केएल राहुलला पहिल्याच षटकात गारद केले. राहुल शुन्यावर बाद झाला. त्यानंतर धावा करण्याचा प्रचंड दबाव असणारा चेतेश्वर पुजारा खेळपट्टीवर आला.

दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात थोड्याफार धावा करणारा पुजारा धावांचा दुष्काळ संपवले असे वाटत होते. मात्र त्यालाही अँडरसनने १ धावेवर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. या दोन धक्यानंतर भारताचा डाव सावरण्यासाठी कर्णधार कोहली खेळपट्टीवर आला.

त्याने आणि रोहित शर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र चांगल्याच भरात असेलल्या अँडरसनने विराटची शिकार केलीच. त्याने कोहलीला ७ धावांवर बाद करत भारताची अवस्था ३ बाद २१ अशी केली. अँडरसनने विराट शिकार ही पहिल्यांदा केलेली नाही.

अँडरसनचे विराट शिकार करण्यात विशेष प्राविण्य आहे. सध्या तो या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनबरोबर स्पर्धा करत आहे. अँडरसनने लीड्सवर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात कोहलीला बाद करुन त्याची सातव्यांदा शिकार केली.

जेम्स अँडरसनने विराट शिकार करण्याच्या बाबतीत लायनशी बरोबरी केली आहे. या यादीत त्याचा सहकारी स्टुअर्ट ब्रॉड देखील आघाडीवर आहे. त्याने ५ वेळी कोहलीला बाद केले आहे. त्याच्या बरोबरीने मोईन अली, पॅट कमिन्स आणि बेन स्टोक्स यांनीही कोहलीला ५ वेळा बाद केले आहे.

कोहलीने या सामन्यात विशेष अर्धशतक ठोकले. कोहलीने गेल्या ५० आंतरराष्ट्रीय डावात एकही शतकी खेळी केलेली नाही. त्याने शेवटचे शतक हे बांगलादेश विरुद्ध २३ नोव्हेंबर २०१९ ला ठोकले होते. कोहलीचे १ जानेवारी २०२० पासून कसोटीतली सरासरी २३.०० इतकी कमी आहे. त्याने ११ कसोटीतील १८ डावात ४१४ धावा केल्या आहेत.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय आहे?

Back to top button