Shivsena Vs BJP : "वरुण सरदेसाई आता आला, तर माघारी जाणार नाही" | पुढारी

Shivsena Vs BJP : "वरुण सरदेसाई आता आला, तर माघारी जाणार नाही"

रत्नागिरी, पुढारी ऑनलाईन : “वरुण सरदेसाई आमच्या घरावर हल्ला करण्यासाठी आला होता. आता परत आला तर माघारी जाणार नाही”, अशी खुली धमकीच राणेंनी वरुण सरदेसाई यांना दिली आहे. भाजप आणि शिवसेना (Shivsena Vs BJP) यांच्यांत चांगली जुंपली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री उद्धव ठाकरे यांच्या पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते (Shivsena Vs BJP) एकमेकांना भिडले.

त्यात युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनीदेखील जुहूच्या नारायण राणेंच्या बंगल्यावर तीव्र आंदोलन केलं होते. त्यावर नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नारायण राणे पुढे म्हणाला की, “आमच्या घरावर हल्ला करणारा मुख्यमंत्र्यांचा नातलग आहे. त्यामुळे त्याला अटक होत नाही. तो काय आणून देतो, त्यामुळे त्यांची एवढी वट? कुठल्यागी नेत्याला एवढा पोलिस बंदोबस्त नाही, तेवढा त्याला आहे”, असंही ते म्हणाले.

“वरुण सरदेसाईनं आंदोलनादरम्यान एवढा मार खाल्ला की, एवढे पोलिस असूनदेखील तिथल्या आमच्या मुलांनी एवढा चोपला ना त्याला… आता परत आला तर माघारी जाणार नाही”, असा इशाराच नारायण राणेंनी दिला.

पहा व्हिडीओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

Back to top button