अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड जितेंद्र शिंदेंची बदली, दीड कोटी पगार घेत असल्याची चर्चा | पुढारी

अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड जितेंद्र शिंदेंची बदली, दीड कोटी पगार घेत असल्याची चर्चा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचे पोलिस बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे यांच्या कमाईबद्दल सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत होत्या. या पोस्टमध्ये त्यांचे वार्षिक वेतन १.५ कोटी रुपये असल्याचे म्हटले होते. या प्रकरणी आता जितेंद्र शिंदे यांची चैाकशी सुरू करण्यात आली आहे. आणि त्यांची बदलीही करण्यात आली आहे.

कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे आता मुंबई पोलिसांशी जोडले आहेत. शिंदे आतापर्यंत अमिताभ बच्चन यांचे अंगरक्षक म्हणून काम करत होते. त्यांची एका वर्षाची कमाई १.५ कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हे पैसे त्यांना येतात कोठून याचा तपास सुरु आहे.

शिंदे यांनी पोलिसांना सांगितले की त्यांची पत्नी एक सुरक्षा एजन्सी चालवते. ज्याद्वारे ते अनेक सेलेब्सना सुरक्षा देतात. अमिताभ बच्चन यांनी त्यांना १.५ कोटी रुपये दिल्याचे शिंदे यांनी स्पष्टपणे नाकारले आहे.

आता राज्य सरकार चौकशी करत आहे. शिंदे यांनी आपल्या इतर कमाईबद्दल प्रशासनाला माहिती दिली होती का आणि ते इतर कुठल्या ठिकाणाहून पैसे कमवायचे. महाराष्ट्राच्या सेवा नियमांनुसार, सरकारी कर्मचारी दोन आस्थापनांकडून पगार स्वीकारू शकत नाही.

जितेंद्र शिंदे नेहमीच बिग बींसोबत सावलीप्रमाणे राहिले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांपासून ते चित्रपटाच्या सेटपर्यंत, जितेंद्र शिंदे कायम अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसले. मात्र आता जितेंद्र शिंदे यांची दक्षिण मुंबईतील पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

हे ही वाचलत का :

अभिनेता संतोष जुवेकरचं फेसबुक अकाऊंट हॅक

Back to top button