राष्ट्रकूल स्पर्धेपूर्वी आणखी एक महिला क्रिकेटपटूला कोरोनाची लागण, तीन दिवसांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुकाबला

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला क्रिकेट टीममधील आणखी एका क्रिकेटपटूला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रकूल स्पर्धेसाठी ती बर्मिंघमला रवाना झालेली नाही. सध्या ती गृह विलगीकरणात आहे. २९ जुलै राजी भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना होणार आहे.
२४ जुलै रोजी भारतीय महिला क्रिकेट संघ बर्मिंघमला रवाना झाला आहे. यापूर्वीही आणखी एक महिला खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. याला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दुजोरा दिला होता. यानंतर संघातील आणखी एका क्रिकेटपटूला कोरोनाची लागण झाली. सध्या दोन्ही महिला क्रिकेटपटू घरातच उपचार घेत आहे. त्यामुळे या दोघी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याला मुकणार आहेत. या दोघींचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना बर्मिंघमला रवाना होणार आहे.
राष्ट्रकूल स्पर्धेत ३१ जुलै रोजी भारतीय महिला क्रिकेट संघ पाकिस्तानविरुद्धचा सामना आहे. तर साखळीतील अंतिम सामना ३ ऑगस्ट रोजी बार्बाडोस विरुद्ध सामना होणार आहे. महिला टीम इंडियाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे.
हेही वाचा :
- Monkeypox : ‘मंकीपॉक्स’ जीवघेणा नाही; पॅन कोरोना व्हॅक्सीनवर काम सुरु : डॉ. रमण गंगाखेडकर
- Uddhav Thackeray B’day : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा; पण…
- Narayan Rane : ठाकरेंकडून माझ्या हत्येसाठी गँगस्टरला सुपारी : नारायण राणे