Uddhav Thackeray B’day : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा; पण… | पुढारी

Uddhav Thackeray B'day : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा; पण...

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ६२ वा वाढदिवस. (Uddhav Thackeray B’day) त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या अधिकृत सोशल मीडियावरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर व फेसबुक अकाउंटवरुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विट व फेसबुक पोस्टम्ध्ये लिहले आहे की, “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना”.

Uddhav Thackeray B’day : शिवसेना पक्षप्रमुख उल्लेख जाणीवपुर्वक टाळला?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्यांनी आपल्या शुभेच्छामध्ये उद्धव ठाकरे यांचा माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. पण शिवसेना पक्षप्रमुख हा उल्लेख टाळला आहे. यामुळे तर्क वितर्क सोेशल मीडियावर केले जात आहेत.

राज्यसभेच्या निवडणुकानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण मिळत गेले. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील एक-एक करत बहुतांश आमदार जावून मिळाले. उ्द्धव ठाकरे आणि बंडखोर नेत्यांच्यात दुरावा वाढत गेला. दरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरुच होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. पण त्यानंतर आता शिवसेना कुणाची हा वाद सुरु आहे.

मात्र श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा ‘पक्षप्रमुख’ असा उल्लेख…

पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपत्र श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मध्ये पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमुद केले आहे की,  पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना”.

हेही वाचलंत का?

Back to top button