National Herald case: दोन दिवसात सोनिया गांधींवर 75 प्रश्नांची सरबत्ती! आज तिस-या दिवशी पुन्हा ईडी चौकशी | पुढारी

National Herald case: दोन दिवसात सोनिया गांधींवर 75 प्रश्नांची सरबत्ती! आज तिस-या दिवशी पुन्हा ईडी चौकशी

पुढारी ऑनलाइन डेस्क : नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी चौकशीसाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडी (अंमलबजावणी संचलनायल)ने आज पुन्हा बोलावले आहे. आतापर्यंत दोन दिवस चाललेल्या आठ तासांच्या सत्रात सोनियांनी 75 हून अधिक प्रश्नांची उत्तरे नोंदवली आहेत, यापूर्वी राहुल गांधी यांच्या चौकशी दरम्यान सुमारे 100 प्रश्नांवर राहुलचे उत्तर रेकॉर्ड करण्यासाठी तपासकर्त्यांना पाच दिवस लागले, असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी सोनिया गांधी यांना समन्स बजावून ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 21 जुलै रोजी सोनिया या ईडीच्या दिल्ली कार्यालयात दाखल झाल्या होत्या. त्यादिवशी त्यांची अडीच तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर काल पुन्हा सोनिया यांची चौकशी झाली होती. दोन दिवसांच्या आठ तासाच्या चौकशीत ईडीने त्यांना जवळपास 75 प्रश्न विचारले. सोनिया यांनी 75 प्रश्नांची उत्तरे नोंदवली आहेत.

दरम्यान, सोनियां यांच्या ईडी चौकशीवरून संपूर्ण देशात काँग्रेसने तीव्र निदर्शने केली. काँग्रेस 21 तारखेला देशात मोठ्या प्रमाणात आक्रमक झाली होती. ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आज ईडीने पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

नॅशनल हेराल्‍ड प्रकरणी सोनिया गांधींची ईडीकडून अडीच तास चौकशी

National Herald Case : चौकशीसाठी सोनिया गांधी ईडी कार्यालयात दाखल; देशभरात काँग्रेस आक्रमक

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण आणि त्याचा तपशील?

नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्र नुकसानीत चालत आहे. या वृत्तपत्राच्या आर्थिक बाबींमध्ये हेराफेरी करून याला हडपण्याचा आरोप करण्यात आला आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी आतापर्यंत झालेल्या घडामोडी

1 नोव्हेंबर 2012
भाजप नेता सुब्रमण्यम स्वामींनी दावा दाखल केला

26 जून 2014
कोर्टाने सोनिया गांधी, राहुल गांधी सोबत अन्य सर्व आरोपींना समन्स बजावले

1 ऑगस्ट 2014
ईडीने केस दाखल केला

19 डिसेंबर 2015
दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने सर्व आरोपींना जामीन दिला

2016
सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसी नेत्यांच्या विरोधात कारवाई रद्द करण्याचा नकार दिला

सप्टेंबर 2018
दिल्ली उच्च न्यायालयात सोनिया आणि राहुलची आयकर विभागाची नोटीस विरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली

2 जून 2022
ईडी ने सोनिया आणि राहुल यांच्या चौकशीसाठी समन्स जारी केले
राहुल गांधी यांची जवळपास 50 तसा चौकशी झाली आहे. तर आज सोनिया गांधी यांची चौकशी होणार.

Back to top button