Monkeypox : 'मंकीपॉक्स' जीवघेणा नाही; पॅन कोरोना व्हॅक्सीनवर काम सुरु : डॉ. रमण गंगाखेडकर | पुढारी

Monkeypox : 'मंकीपॉक्स' जीवघेणा नाही; पॅन कोरोना व्हॅक्सीनवर काम सुरु : डॉ. रमण गंगाखेडकर

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : देशभरात सध्या मंकीपॉक्सचे  (Monkeypox) केवळ दोन- चार रुग्ण आढळले आहेत. काही देशांमध्ये हा आजार गेल्या २० वर्षांपासून आहे, कोरोना ज्या प्रमाणे वेगाने पसरला, त्या प्रमाणात मंकीपॉक्स पसरण्याची शक्यता वाटत नसल्याने त्याला घाबरण्याची गरज नाही, असे आयसीएमआरचे माजी साथरोग आणि संसर्गजन्य विभागप्रमुख पद्धश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले. एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या पदवीदान समारंभानिमित्त औरंगाबादेत आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

देशात कोरोना संसर्गाच्या दहशतीमुळे मंकीपॉक्सचेही (Monkeypox) रुग्ण आढळल्याने नागरिक घाबरले आहेत. यावर डॉ. गंगाखेडकर यांनी कोरोना विषाणू आणि मंकीपॉक्स यामधील फरक समजावून सांगितला. यावेळी ते म्हणाले की, काही देशांमध्ये मंकीपॉक्सचे गेल्या २० वर्षांपासून रुग्ण आढळत आहेत. नायजेरिया देशात रुग्णांची संख्या मोठी होती. युरोप- अमेरिकेतही याचे रुग्ण आढळतात. मात्र, आजार एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना हा आजार पसरला तर भीती आहे. हा आजार आला तर रुग्णालयात भरती करुन उपचार करावे लागतील, मात्र या आजारामध्ये ९९.९९ टक्के रुग्ण बरे होतात, मृत्यूचा धोका अत्यंत कमी असेल. रुग्णालयात केवळ आसोलेशनसाठी भरती व्हावे लागेल, त्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितले.

Monkeypox : पॅन कोरोना व्हॅक्सीनवर काम सुरु

अवघ्या जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सध्या लसीकरण सुरु आहे. प्रत्येक वर्षी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी लागेल काय ? या प्रश्नावर बोलताना डॉ. गंगाखेडकर म्हणाले की, सध्या पॅन कोरोना व्हॅक्सीन डेव्हलप करण्याचे काम सुरु असून यावर ८ ग्रुप काम करत आहेत. दरम्यान, सध्या बुस्टर अत्यंत उपयोगी असून यामध्ये उपचारासाठी दवाखान्यात भरती होणे तसेच मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. वृद्धांनी तर बुस्टर डोस घेतलाच पाहिजे, असेही डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितले.

नवीन आजारांकडे लक्ष देण्याची गरज

कोरोनानंतर येणाऱ्या काळात नवीन आजारांकडे नागरिकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत डॉ. गंगाखेडकर म्हणाले की, वातावरण बदलामुळे माणसांना तसेच जनावरांमध्ये आढळणाऱ्या आजारांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. जनावरांमध्ये आढळणारे काही आजार माणसांमध्येही आढळत आहेत. जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती आणि मानसाची रोगप्रतिकारक शक्ती ही वेगवेगळी असते. या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे. आजार हे मानवजातीचे शत्रू असून गेल्या काही वर्षात कॉलरा सारख्या आजारांमुळे अनेक मृत्यू झाले होते, आता ते कोविड १९ मुळे झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button