cricket laws : क्रिकेटच्‍या नियमांमध्‍ये मोठे बदल, १ ऑक्‍टोबरपासून होणार अंमलबजावणी | पुढारी

cricket laws : क्रिकेटच्‍या नियमांमध्‍ये मोठे बदल, १ ऑक्‍टोबरपासून होणार अंमलबजावणी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
मेरिलबोन क्रिकेट क्‍लब (एसीसी ) क्रिकेट खेळाचे नियम ठरवते. या क्‍लबने बुधवारी आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधील नियमांमध्‍ये बदल ( cricket laws ) केल्‍याचे जाहीर केले. मात्र हे सर्व नियम हे १ ऑक्‍टोबर २०२२ पासून लागू केले जातील. ऑस्‍ट्रेलियात होणार्‍या टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेपूर्वी हे नियम लागू केले जाणार आहेत.

चेंडूला थुंकी लावण्‍यास असेल बंदी

चेंडूला चमक देण्‍यासाठी चेंडूला थुंकी लावली जात असे. आता यावर बंदी घालण्‍यात आली आहे. हा नियम हा कोरोना महामारी आल्‍यानंतर लागू करण्‍यात आला होता. आता ‘एमसीसी’ ने याचा अधिकृत नियम केला आहे. आता खेळाडुंना केवळ घामाचा वापर करता येणार आहे.

खेळाडू ऑउट झाल्‍यानंतर नवीच खेळाडू घेणार स्‍ट्राइक

आता नवीन नियमानुसार फलंदाज आउट झाल्‍यानंतर त्‍याच्‍या जागी नवीनच खेळाडू स्‍ट्राइक घेईल. यापूर्वी फलंदाज झेलबाद झाल्‍यास खेळणारा खेळाडू हा बॉलिंग एंडवर धावत जात असे. त्‍यामुळे नवीन फलंदाज हा नॉन स्‍ट्राइकर एंडलाच थांबत असे. मात्र आता फलंदाज बाद झाला तर नवीन फलंदाजच स्‍ट्राइक घेणार आहे. या नियमाचा वापर हा इंग्‍लंड ॲण्‍ड वेल्‍स क्रिकेट बोर्डने
( ईसीबी ) हंड्रेड लीगमध्‍ये या नियमाचा अंमलबाजावणी केली आहे. आता केवळ षटक संपले असेल तरच नवा फलंदाज हा नॉन स्‍ट्राइकरला जाईल.

cricket laws : फलंदाज ‘मंकडिंग’ वर होणार धावचीत

मंकडिंग ( नॉन स्‍ट्राइकवर असलेल्‍या फलंदाजाने गोलंदाजाने चेंडू टाकण्‍यापूर्वीच क्रिज सोडल तर गोलंदा संबंधित फलंदाजाला धावचीत करतो ) पद्‍धतीने फलंदाजाला गोलंदाज बाद करु शकतो, मात्र यामध्‍ये तो अपयशी ठरल्‍यास हा चेंडू ‘डेड बॉल ‘ मानला जाईल, असे नवीन नियमात स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. यापूर्वी क्रिकेटमधील नियम ४१ नुसार अशा प्रकारे फलंदाजास बाद करणे खिळाडूवृती विरोधात असल्‍याचे मानले जात होते. मात्र आता नियम ३८ नुसार अशा प्रकारे बाद करणे धावचीत मानले जाणार आहे.

आशा प्रकारे बाद होण्‍यास मंकडिंग हे नाव कसे पडले?

१९४७ मध्‍ये भारत आणि ऑस्‍ट्रेलिया कसोटी मालिकेतील एका सामन्‍यात भारताच्‍या विनू मंकड यांनी गोलंदाजीपूर्वी क्रीज सोडून पुढे गेलेल्‍या बिल ब्राऊनला रन आऊट केले. तेव्‍हापासून अशा पद्‍धतीने फलंदाजाला आऊट केल्‍यास मंकडिंग असे संबोधले गेले. यावेळी यावर ऑस्‍ट्रेलियात मोठी टीकाही झाली होती. अशा प्रकारे फलंदाजास आऊट करणे खिळाडूवृती नाही, असे म्‍हटलं गेले. मात्र आता हा नियम कायम ठेवण्‍यात आला आहे.

डेड बॉलच्‍या नियमात बदल

क्रिकेट मैदानात सामना सुरु असताना अचानक क्रिकेट फॅन, पाळीव प्राणी किंवा एखाद्‍या वस्‍तुंमुळे खेळास अडथळा अल्‍यास पंच त्‍यावेळी टाकण्‍यात आलेला चेंडू हा डेड बॉल घोषित करु शकतात.

… तर फलंदाजी करणार्‍या संघाला मिळणार ५ अतिरिक्‍त धावा

आता यापुढे क्षेत्ररक्षण करताना खेळाडूंना काळजी घ्‍यावी लागणार आहे. कारण संबंधित खेळाडूने चुकीच्‍या हालचाली केल्‍यास फलंदाजी करणार्‍या संघाला ५ अतिरिक्‍त धावा दिल्‍या जाणार आहेत. यापूर्वीच्‍या नियमानुसार क्षेत्ररक्षण करणार्‍या खेळाडूंनी काही चुकीच्‍या हालचाली केल्‍यास डेड बॉल दिले जात होते. तसेच हा चेंडू फलंदाजाने फटकावल्‍यास त्‍यावरील धावा ग्राह्य मानल्‍या जात नव्‍हत्‍या.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडीओ :

Back to top button