Final GT vs RR : ‘आयपीएल’ कोण जिंकणार, शोएब अख्तर-हरभजन सिंग म्हणाले… | पुढारी

Final GT vs RR : 'आयपीएल' कोण जिंकणार, शोएब अख्तर-हरभजन सिंग म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२२ च्या हंगामातील अंतिम सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. गुजरात टायटन्सने आपल्या पहिल्याच हंगामात आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. तर राजस्थान रॉयल्सने पंधरा वर्षांपूर्वी फायनल जिंकत इतिहास रचला होता. त्यानंतर पहिल्यांदाच राजस्थानने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आयपीएल २०२२ चा फायनल सामना कोण जिंकणार याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मोठे विधान केले आहे. (Final GT vs RR)

शेन वॉर्न यांच्यासाठी राजस्थान रॉयल्स जिंकायला हवी, त्यांच्यासाठी १४ वर्षांनंतर आयपीएलचा किताब जिंकणे महत्वपूर्ण असेल; पण मला वाटत होते की, लखनौ सुपर जायंट्स किंवा गुजरात टायटन्स फायनल सामना जिंकेल पण लखनौचा संघ आयपीएच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. माझे मन मला सांगत आहे की, आयपीएल गुजरात टायटन्स जिंकेल, असे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोअब अख्तर म्हणाला आहे. (Final GT vs RR)

मला वाटते की, गुजरात टायटन्स जिंकेल. पण जोस बटलर दमदार फलंदाजी केली तर सामना गुजरातसाठी अवघड असेल. तरीही गुजरात टायटन्सची गोलंदाजी चांगली आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सचं आयपीएलचा फायनल सामना जिंकेल असे, भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग म्हणाला आहे. (Final GT vs RR)

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सच्या संघाने आपल्या पदापर्णातच फायनल गाठली आहे. गुजरातच्या संघात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये संतुलन आहे. आजच्या अंतिम सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिका पंड्या कशी कामगिरी करतो याकडेही सर्वांचे लक्ष्य आहे. (Final GT vs RR)

हेही वाचलतं का?

Back to top button