Shikhar Dhavan : गब्बरची बॉलीवूडमध्ये एन्ट्री...

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिखर धवनला सिनेमे पाहण्याची खूप आवड आहे. सिनेमे पाहण्यासोबतच त्याला अभिनयाचीदेखील चांगलीच आवड आहे. अभिनयाची भूक भागवण्यासाठी शिखर सोशल मीडियावर व्हिडीओ किंवा रील्सच्या माध्यमातून आपला अभिनयाचे सादरीकरण करत असतो. त्याचे चाहते त्याच्या या व्हिडीओ रील्सना डोक्यावर घेताना आपल्याला दिसतात. असाच त्याने एक रील्स जानेवारी महिन्यात अल्लू अर्जुनचा गाजलेल्या ‘पुष्पा’ चित्रपटाचा एक डायलॉग बोलला होता. यात त्याने आपले अभिनय कौशल्य दाखवले होते. तो चांगलाच व्हायरलदेखील झाला होता.
सोशल मिडीया आपला अभिनय सादरा करणााऱ्या गब्बरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रील्स बनवणारा गब्बर आता आपल्याला लवकरच मोठ्या पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहे. यावर्षाच्या अखेर शिखरचा पहिला सिनेमा आपल्याला पाहायला मिळू शकतो. (Shikhar Dhavan)
आयपीएल २०२२ हंगामात गब्बर पंजाब संघाकडून खेळत आहे. पंजाबकडून खेळताना धवन आपल्या नैसर्गिक लयीत खेळताना दिसत आहे, संघाच्या विजयात त्याचा मोठा वाटा नेहमी असतो. क्रिकेटच्या पीचवर आक्रमक खेळी करणारा भारतीय क्रिकेटचा गब्बर आता त्याच आक्रमक शैलीमध्ये बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिखर धवन सिनेमाचे शुटिंगदेखील पूर्ण केले आहे. परुंतु याबद्दल अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.(Shikhar Dhavan)
सूत्रांनी दिलेल्यामाहितीनुसार…
सूत्राने सांगितले की, “शिखर धवनला कलाकारांबद्दल खूप आदर आहे. सिनेमाच्या निर्मात्यांना शिखर धवन हीच रोलसाठी योग्य असल्याचे वाटले म्हणून त्यांनी शिखरशी संपर्क साधला.निर्मात्यांनी सिनेमात काम करण्याच्या केलेल्या मागणीला शिखरने लगेचचं होकार दिलाय. या सिनेमातील भूमिकेसाठी शिखरला मागील महिन्यातच विचारणा करण्यात आली होती. या चित्रपटात शिखर एका महत्वाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. हा सिनेमा २०२२ या वर्षाच्या शेवटतच्या महिन्यात प्रर्दशित होण्याचे संकेत आहेत.
View this post on Instagram
अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील शिखरने केलेला रील चांगलाच व्हायरल झाला. गब्बर या भूमिकेत पाहून त्याचे चाहते चांगलेच खुष झाले होते. ‘पुप्षा’ या चित्रपटाने सुमारे ३०० कोटीं रूपयांची कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर हिट होण्याबरोबरच, तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील हा सिनेमा मोठ्या प्रमाणात पाहण्यात आला होता. २०२१ मधील सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे.
हेही वाचा…
- पालिकेच्या वतीने आपत्कालीन व्यवस्थापनासाठी ‘कंट्रोल सेंटर’
- आता आमदार, खासदारांचीही माहिती हवी!
- व्हेल माशाची ६ कोटी रुपये किंमतीची उलटी जप्त; तस्करी करणाऱ्या टोळीतील दोघांना बेड्या
- दिल्लीच्या जामा मश्जिदीखाली हिंदू मंदिर असल्याचा हिंदू महासभेचा दावा : पंतप्रधान मोदींकडे केली उत्खननाची मागणी
- निष्पाप जीवांचा बळी का? चिमुकल्यांचा आम्ही केला असता सांभाळ; नातेवाईकांचा टाहो फोडणारा आक्रोश
- IAS Arpit Varma : ‘होय, आमची शेवटची पिढी आहे, ज्यांच्याकडे अशी आई आहे…’