दिल्लीच्या जामा मशिदीखाली हिंदू मंदिर असल्याचा हिंदू महासभेचा दावा : पंतप्रधान मोदींकडे केली उत्खननाची मागणी | पुढारी

दिल्लीच्या जामा मशिदीखाली हिंदू मंदिर असल्याचा हिंदू महासभेचा दावा : पंतप्रधान मोदींकडे केली उत्खननाची मागणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : वाराणसीची ज्ञानवापी मशीद, कुतुबमिनार आणि ताजमहलनंतर आता हिंदू संघटनांनी आपला मोर्चा  दिल्ली जामा मशिदीकडे वळवला आहे. जामा मशिदीखाली हिंदू देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी केला आहे. स्वामी चक्रपाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहित जामा मशिदीचे चबूतरे आणि पायऱ्यांचे उत्खनन करून मूर्ती बाहेर काढण्याची मागणी केली आहे.

हिंदू महासभेच्या अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरचं शाही इमामकडेही मशिदीचे उत्खनन  करण्याची मागणी केली आहे. पुढे हिंदू महासभेची अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी म्हटले आहे की, उत्खनन केले तर सर्व सत्य लोकांसमोर येईल. काही दिवसांपासून वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्‍या आवारातील विहिरीत  शिवलिंग असल्याचा दावा हिंदू संघटनांकडून केला जात होता. त्यानंतर हिंदू आणि मुस्लीम संघटनांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत.  स्वामी चक्रपाणी यांनी यापूर्वी दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ ठेवण्याची मागणी केली होती.

हेही वाचलतं का?

Back to top button