IAS Arpit Varma : 'होय, आमची शेवटची पिढी आहे, ज्यांच्याकडे अशी आई आहे...' | पुढारी

IAS Arpit Varma : 'होय, आमची शेवटची पिढी आहे, ज्यांच्याकडे अशी आई आहे...'

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्हाला फ.मुं. शिंदेची कविता आठवते का?

आई एक नाव असतं                                                                                                                                                      घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!                                                                                                                                सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही                                                                                                                                    आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही… फ.मुं म्हणतात ते खरचं आहे. आई हे असं गाव आहे जिथे आपल्या सर्वांना रमायला आवडतं. असचं आईबद्दल असणारी कृतज्ञता व्यक्त करणारं एक पत्र सध्या सोशल मीडियावर सध्‍या व्हायरल होत आहे.

IAS Arpit Varma
IAS Arpit Varma

माणूस आपल्या आईबद्दलचं प्रेम कोणत्या ना कोणत्या माध्यमातून व्यक्त करत असतो. कोण बोलून व्यक्त होतो, कोणी गिफ्ट देतो, तर कोणी लिहतो मग ती कविता असो, ती चारोळी असो किंवा तो भलामोठा लेख असो. असचं आयएएस अधिकारी अर्पित वर्मा यांनी आपल्या आईसाठी लिहलेल्या पत्राचं पान सध्‍या सोशल मीडीयावर व्हायरल होतं आहे. त्यामध्ये त्यांनी  (IAS Arpit Varma) आपल्या आईबद्दल असणारी भावना व्यक्त केली आहे. पाहूया त्‍यांनी आपल्‍या आईसाठी पत्रात काय लिहलं आहे ते.

IAS Arpit Varma : आमची ही शेवटची पिढी

आयएएस अधिकारी अर्पित वर्मा (IAS Arpit Varma) यांनी एका वहीच्या पानावरआपल्या आईबद्दल असणारी भावना व्यक्त केली आहे. अर्पित वर्मा यांनी वहीच्या पानावर लिहलेलं पत्र आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलं. शेअर करताच हा  फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी हिंदीमध्ये लिहलं आहे. त्याचा आशय असा आहे, ” आमची ही शेवटची पिढी असेल ज्यांच्याकडे अशी मायाळू आई आहे, जिचं सोशल मीडियावर अकाउंट नाही. ना फोटो, ना सेल्फीचा शौक आहे. तिला हेही माहीत नाही की, स्मार्ट फोनच लॉक कसं काढायचं. आपली जन्मतारीख काय आहे हे माहीत नाही. त्यांनी आपलं आयुष्य कमी सुविधेत घालवलं तेही कोणतीही तक्रार न करता. होय आमची शेवटची पिढी आहे, ज्यांच्याकडे अशी आई आहे, अशा ह्रदयस्पर्शी शब्दात आई बद्दलच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

त्यांच हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आतापर्यंत ९ हजारहून अधिक युझर्सनी हे ट्विट लाईक केले आहे तर १२०० हून अधिक युझर्सनी ट्विट रिट्विट केले आहे. मातृदिन दिवशीही त्यांनी आपल्या आईबदद्ल भावना व्यक्त करुन आईला शुभेच्छा दिल्या होत्या.

हेही वाचलंत का? 

Back to top button