भारतीय पोराकडून ऑस्ट्रेलियाच्या पोरगीला प्रपोज डायरेक्ट मैदानात (video) | पुढारी

भारतीय पोराकडून ऑस्ट्रेलियाच्या पोरगीला प्रपोज डायरेक्ट मैदानात (video)

सिडनी : पुढारी ऑनलाईन

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा (AUSvIND 2ODI)५१ धावांनी पराभव करुन मालिका २-० अशी खिशात घातली. क्रिकेट जगतात कांगारूंच्या तुफान फलंदाजांची चर्चा रंगली असताना यासोबत आणखी एक चर्चा रंगली ती म्हणजे एका प्रेमीयुगुलाची. सामना सुरू असतानाच एका भारतीय चाहत्याने चक्क ऑस्ट्रेलियन सपोर्टर तरूणीला (indvsaus live proposed) प्रपोज केले. आणि तिनेही त्याला होकार देत मिठ्ठी मारत आपल्या प्रेमाची कबुली दिली. हे पाहुन क्षेत्ररक्षण करणारा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मॅक्सवेलने (Glenn Maxwell) टाळ्या वाजवून दोघांचे अभिनंदन केले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या डावानंतर भारतीय संघ खेळत होता तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका भारतीय चाहत्याने ऑस्ट्रेलियाला पाठिंबा देणाऱ्या मुलीला रिंग देऊन लग्नासाठी प्रपोज केले. त्याचे प्रपोजल पाहताच तिने देखील आपल्या प्रेमाची कबुली देत भर प्रेक्षकांमध्ये मिठ्ठी मारून आपल्या भावना व्यक्त केल्या. हा रोमँटिक सिन पाहताच क्षेत्ररक्षण करणारा मॅक्सवेलने (Glenn Maxwell) दोघांसाठी टाळ्यासाठी वाजवल्या. स्वतः मॅक्सवेलने भारतीय सेलिब्रेटीशी लग्न केले आहे.

प्रपोज केल्यानंतर या कपलसोबत माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. प्रपोजसंदर्भात विचारले असता भारतीय चाहता म्हणाला, प्रप्रोज करण्याचा प्लॅन खुप आधीपासुन होता. पण लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही. पण मला सामन्यादरम्यान प्रपोज करण्याची कल्पना चांगली वाटली.  प्रपोजसंदर्भात ऑस्ट्रेलियाच्या तरूणीला विचारले असता, ती म्हणाली माझ्यासाठी हे सरप्राईज् होत. यांसदर्भात मला कोणतीच माहिती नव्हती. मी खुप खुष आहे. अशी देखील भावना तिने यावेळी व्यक्त केली.  

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ४ बाद ३८९ धावा केल्या. हे महाकाय आव्हान भारताला पेलवले नाही. भारताला ५० षटकात ९ फलंदाजांच्या मोबदल्यात ३३८ धावांपर्यंतच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने पहिल्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात दमदार शतक ( १०४ ) ठोकले. तर वॉर्नर (८३), फिंच (६०), लॅम्बुश्चग्ने (७०) आणि मॅक्सवेलने आक्रमक (६३) धावा करुन ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्याला चांगला हातभार लावला.

कांगारुंच्या ३९० धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने ८९ धावांची झुंजार खेळी केली. त्याला केएल राहुलनेही ७६ धावा करुन चांगली साथ दिली. पण, डोक्यावर असणार धावांचा डोंगर आणि कांगारुंनी मोक्याच्या क्षणी काढलेल्या विकेट यामुळे भारताला ५० षटकात ३३८ धावांपर्यंतच मजल मारता आली.

Back to top button