जय शहांची थेट आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड!  | पुढारी

जय शहांची थेट आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड! 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

आशियाई क्रिकेट परिषदेवर आता भारताचे वर्चस्व असेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शहा यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या ( Asian Cricket Council) अध्यक्षपदी निवड झाली आहे. जय शहा यांनी नजमुल हसन यांची जागा घेतली. बीसीसीआय सचिव जय शहा यांची  एकमताने आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शहा बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) प्रमुख नजमुल हसन पापोन यांची जागा घेतील. (BCCI secretary Jay Shah was unanimously elected as the President of the Asian Cricket Council) 

अधिक वाचा : रणजी करंडक स्पर्धा ८७ वर्षांत पहिल्यांदाच रद्द

बीसीसीआयचे (BCCI) कोषाध्यक्ष अरुण सिंह धुमल यांनी ट्विटरवर ही बातमी शेअर केली. धूमल यांनी लिहिले की, ‘जय शहा यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन. मला खात्री आहे की एसीसी तुमच्या नेतृत्वाखाली नवीन उंची गाठेल आणि संपूर्ण आशियाई प्रदेशातील क्रिकेटपटूंना याचा फायदा होईल. यशस्वी कालावधीसाठी माझ्या शुभेच्छा.

अधिक वाचा : कोहली, तमन्नाला केरळ हायकोर्टाची नोटीस 

आशिया करंडक स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी एसीसीची आहे. कोविड-१९ साथीमुळे २०२० मध्ये आशिया करंडक यावर्षी जूनपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. सुरुवातीला पाकिस्तानला या स्पर्धेचे यजमानपद होते, पण आता श्रीलंका किंवा बांगलादेशात होऊ शकते.

अधिक वाचा : ‘ऑस्ट्रेलियात टीम इंडिया वर्णद्वेशाची शिकार, माझ्या अशिलाच्या जीवालाही धोका’

Back to top button