ENGw vs INDw : फॉलो ऑन मिळाल्यानंतर शेफालीवरच मदार | पुढारी

ENGw vs INDw : फॉलो ऑन मिळाल्यानंतर शेफालीवरच मदार

ब्रेस्टोल; पुढारी ऑनलाईन : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताला फॉलो ऑन मिळाला आहे. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने १ बाद ५७ धावांपर्यंत मजल मारली. पण, याही सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबवण्यात आला आहे. खेळ थांबला त्यावेळी सलामीवीर शेफाली वर्मा ४७ धावांवर नाबाद होती. तर दिप्ती शर्माने ४४ चेंडूत १ धाव केली होती. 

वाचा : #WTCFinal : तिन्ही सत्राचा हिरो एकच ‘पाऊस’

पहिल्या दिवशीच्या ५ बाद १८७ धावांवरुन पुढे खेळताना भारताचा दुसरा डाव २३१ धावाच संपुष्टात आला. भारताकडून दिप्ती शर्माने एकाकी झुंज देत नाबाद २९ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने भारताला फॉलो ऑन दिला. भारताची दुसऱ्या डावात खराब सुरुवात झाली. पहिल्या डावात ७८ धावांची खेळी करणारी सलामीवीर स्मृती मानधना ८ धावा करुन बाद झाली. त्यानंतर मात्र शेफाली वर्माने पहिल्या डावाप्रमाणेच याही डावात आक्रमक फलंदाजी करत भारताला अर्धशतकी मजल मारून दिली. 

वाचा :  WTC Final : भारताने एक दिवस आधी संघ घोषित करुन चूक केली?

दरम्यान, सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबवण्यात आला. सामना पुन्हा सुरु झाल्यानंतर शेफालीने आपले अर्धशतक पूर्ण केले. चहापानासाठी खेळ थांबला त्यावेळी शेफाली ५५ धावांवर तर दिप्ती शर्मा १८ धावांवर नाबाद होती. भारत अजून ८२ धावांनी पिछाडीवर आहे. सामन्यात पावसाने पुन्हा व्यत्यय आणल्यामुळे खेळ पुन्हा थांबवण्यात आला आहे. 

Back to top button