रोहित शर्माला दुहेरी धक्‍का …सामना गमावला, ‘स्‍लो ओव्‍हर रेट’मुळे १२ लाखांचा दंडही | पुढारी

रोहित शर्माला दुहेरी धक्‍का ...सामना गमावला, 'स्‍लो ओव्‍हर रेट'मुळे १२ लाखांचा दंडही

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मुंबई इंडियन्‍सचा कर्णधार रोहित शर्मा याला रविवारी दुहेरी धक्‍का बसला. आयपीएल स्‍पर्धेतील दिल्‍ली कॅपिटल्‍स विरुद्‍धचा सामना गमावला. यानंतर त्‍याला १२ लाख रुपयांचा दंडही सुनावण्‍यात आला आहे. निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्‍याने ( स्‍लो ओव्‍हर रेट ) त्‍याच्‍यावर आयपीएल व्‍यवस्‍थापनाने ही कारवाई केली.

२७ मार्च रोजी ब्रेबोर्न स्‍टेडियमवर मुंबई इंडियन्‍स विरुद्‍ध दिल्‍ली कॅपिटल्‍स सामना झाला. यावेळी मुंबई इंडियन्‍सने निर्धारित वेळेत षटके पूर्ण केली नाहीत. या संघाची ही पहिलीच चूक असल्‍यामुळे कर्णधार रोहित शर्मा याला १२ लाख रुपयांचा दंड करण्‍यात आल्‍याचे आयपीएल व्‍यवस्‍थापनाने स्‍पष्‍ट केले आहे.

‘स्‍लो ओव्‍हर रेट’ म्‍हणजे काय?

स्‍लो ओव्‍हर रेट म्‍हणजे एका संघाने एका तासांमध्‍ये टाकलेली षटकांची संख्‍या. आतंरराष्‍ट्रीय क्रिकेट बोर्डच्‍या नवीन नियमानुसार, वन डे आणि टी-20 सामन्‍यात एका तासात १४. १ षटके टाकली जावीत. तर कसोटी सामन्‍यात १४.२ षटके टाकणे अनिवार्य आहे. वन डे सामन्‍यात ५० षटकांसाठी सुमारे साडेतीन तासांचा वेळ दिला आहे. तर टी-२० सामन्‍यातील २० षटके टाकण्‍यासाठी एक तास २५ मिनिटांचा वेळ दिला आहे.

पहिल्‍याच सामन्‍यात मुंबई संघ पराभूत

ललित यादवने ३८ चेंडूंमध्ये ४८ आणि अक्षर पटेलच्या १७ चेंडूंमध्ये ३८ धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने रविवारी मुंबई इंडीयन्सवर चार गडी राखून विजय मिळवला . अक्षर पटेलच्या ३८ महत्वपूर्ण धावांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने विजयाला गवसणी घातली. यंदाच्‍या आयपीएल स्‍पर्धेतील पहिल्‍याच सामन्‍यात मुंबई संघ पराभूत झाला.

हेही वाचलं का? 

 

Back to top button