Oscars 2022 : ऑस्कर सोहळ्यात राडा; बायकोच्या टकलावर मस्करी केल्यानंतर भडकला विल स्मिथ, निवेदकाच्या कानाखाली लगावली | पुढारी

Oscars 2022 : ऑस्कर सोहळ्यात राडा; बायकोच्या टकलावर मस्करी केल्यानंतर भडकला विल स्मिथ, निवेदकाच्या कानाखाली लगावली

लॉस एंजलिस; पुढारी ऑनलाईन

हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ (American actor Will Smith) याला किंग रिचर्ड चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर (Oscars 2022) मिळाला. पण या सोहळ्याला एका कारणाने गालबोट लागले. हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये ९४ व्या Academy Awards चे आयोजन करण्यात आले होते. पण या लाईव्ह सोहळ्यादरम्यान विल स्मिथ याने कॉमेडियन असलेला निवेदक ख्रिस रॉकच्या (comedian Chris Rock) कानाखाली लगावली. कारण होते ख्रिस रॉकने विल स्मिथच्या पत्नीच्या केसांवर कमेंट केल्याचे. स्मिथने थेट डॉल्बी थिएटरच्या स्टेजवर जाऊन ख्रिस रॉकला ठोसा लगावला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ख्रिस रॉकने विल स्मिथच्या पत्नीची चेष्टा केल्याने हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. रॉकला कानाखाली लगावल्यानंतर, स्मिथनं संतप्त होऊन मागे पाहिले आणि म्हणाला, “माझ्या पत्नीचे नाव तुझ्या तोंडी घेऊ नकोस”. या प्रकारानंतर उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले. या प्रकारानंतर विल स्मिथ आणि ख्रिस रॉक ट्विटरवर ट्रेंड करत आहेत.

विल स्मिथला किंग रिचर्ड चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर (Oscars 2022) मिळाला. पण ऑस्कर मिळण्याआधी स्टेजवर राडा पहायला मिळाला. शो होस्ट करत असलेल्या ख्रिसने विल स्मिथची पत्नी जेडा पिकेंट स्मिथच्या केसांबाबत कमेंट केली. ख्रिस रॉकने आय जेन चित्रपटाविषयी बोलताना, विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथच्या टकलावर मस्करी केली. यावर नाराज झालेल्या स्मिथने स्टेजवर जाऊन ख्रिसच्या कानाखाली लगावली. ऑस्करच्या लाईव्ह सोहळ्यात हा प्रकार घडल्याने सर्व जगाने हा प्रकार पाहिला.

Back to top button