ऑस्कर पुरस्कार 2022 : विल स्मिथ सर्वोत्कृष्ट अभिनेता तर जेसिका ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री | पुढारी

ऑस्कर पुरस्कार 2022 : विल स्मिथ सर्वोत्कृष्ट अभिनेता तर जेसिका ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

पुढारी ऑनलाईन डेस्क: सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा यंदाचा ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधील लॉस एंजेलिस येथे पार पडला. किंग रिचर्ड या चित्रपटासाठी विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर ‘The Eyes of Tammy Faye’ या चित्रपटासाठी जेसिका चेस्टेन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्‍या  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डेव्हिड लिंच दिग्दर्शित अमेरिकन सायन्स फिक्शन चित्रपट ‘ड्यून’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपट ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले.

जगभरातील कोरोना विषाणूच्या साथीमुळे दोन वर्षांनंतर या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोणताही भारतीय चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत पोहोचू शकला नाही; पण भारतीय डॉक्युमेंटरी फिल्म ‘रायटिंग विथ फायर’ हा सर्वोत्कृष्ट माहितीपट शर्यतीत आहे. यावेळी सर्वाधिक चर्चेत ड्युन (Dune) हा चित्रपट हाेता. याने १० श्रेणींमध्ये नामांकन मिळवत ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्ममध्ये जपानच्या ‘ड्राइव्ह माय कार’ चा समावेश करण्यात आला आहे.

विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेता

‘किंग रिचर्ड’ या चित्रपटासाठी विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार स्वीकारताना त्याला स्टेजवर आपल्या भावना आवरता नाही आल्या. स्वत: ला सावरत त्याने आपल्या टीमचे आभार मानले. विल स्मिथला मिळालेला हा पहिलाच ऑस्कर पुरस्कार आहे. यापूर्वी त्याला २००२ मध्ये ‘अली’ आणि २००७ मध्ये ‘द पर्स्युट ऑफ हॅपीनेस’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीमध्ये नामांकन मिळाले होते.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धातील मृतांना श्रध्दांजली

लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटरमध्ये सोमवारी (दि.२८) ९४ वा अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. या समारंभात रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काही क्षण मौन पाळण्यात आले.

९४ व्या ऑस्कर पुरस्कार 2022 चे विजेते

सर्वोत्कृष्ट चित्रपट- कोडा (CODA)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- विल स्मिथ, किंग रिचर्ड (King Richard)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- जेसिका चेस्टेन, द आईज ऑफ टॅमी फाये (The Eyes of Tammy Faye)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- जेन कॅम्पियन, द पॉवर ऑफ द डॉग (The Power of the Dog)
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं- नो टाइम टू डाय, नो टाइम टू डाय (No Time to Die)
सर्वोत्कृष्ट माहितीपट फिचर- समर ऑफ सोल Summer of Soul (…Or, When the Revolution could not be televised)
सर्वोत्कृष्ट अॅडॉप्टेड स्क्रिनप्ले- शियान हेडर (CODA)
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रिनप्ले- केनेथ ब्रनाघ लिखित बेलफास्ट (Belfast)
सर्वोत्कृष्ट कॉश्च्युम डिझाइन- जेनी बीवन (क्रुएला)
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर- ड्राइव्ह माय कार (जपान)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- अॅरिएना डीबोस, वेस्ट साइड स्टोरी (West Side Story)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- ट्रॉय कोत्सुर (CODA)
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर- एन्कँटो (Encanto)
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर- हान्स झिमर, ड्युन (Dune)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- ग्रेग फ्रेजर, ड्युन (Dune)
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स- ड्युन, पॉल लॅम्बर्ट, त्रिस्टान माइल्स, ब्रियान कॉनर, गर्ड नेफ्झर (Dune)
सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग- जो वॉकर, ड्युन (Dune)
सर्वोत्कृष्ट साऊंड- मॅक रुथ, मार्क मांगिनी, थिओ ग्रीन, डग हेम्फिल, रॉन बार्लेट (Dune)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन- पॅट्रिस वर्मिट, शुशाना सिपॉस (Dune)
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टायलिंग- द आइज ऑफ टॅमी फाये, लिंडा डॉड्स, स्टेफनी इन्ग्राम, जस्टीन राले (The Eyes of Tammy Faye)
सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट- द लाँग गुडबाय (The Long Goodbye)
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट- द विंडशिल्ड पायपर (The Windshield Piper)
सर्वोत्कृष्ट माहितीपट शॉर्ट- द क्वीन ऑफ बास्केटबॉल (The Queen of Basketball)

 

 

Back to top button