

खेड, पुढारी ऑनलाईन : ज्यांना काही उद्येाग नाहीत ते टीका करतात, त्यांना गांभीर्याने घेण्याची काहीच गरज नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक प्रत्युत्तर सुजय विखे पाटील यांच्या टीकेवर दिले. खेडमध्ये पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही टिपण्णी केली.
"महाविकास आघाडीचा संसार असा आहे, की यात लग्न राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आहे. राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत आहे, अशी टिका सुजय विखे पाटील यांनी केली होती. या टीकेचा आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला. ते आज खेड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी झटपट निर्णय घेतो तरी देखील टीका कशासाठी? असं मतदेखील त्यांनी यावेळी मांडलं.
कोणत्याही बँकेत घोटाळा झाला तर आरबीआय लक्ष घालते, महाराष्ट्रामध्ये जर काही घडलं तर त्याठिकाणी राज्य पोलीस खातं लक्ष घालतं. सीबीआयला राज्याने नाकारल्यानंतरच्या मुद्यावर बोलत असताना त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली.