Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले, सात दिवसांत सहाव्यांदा दरवाढ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढ सुरुच असून गेल्या सात दिवसांत सहाव्यांदा सोमवारी तेल कंपन्यांनी इंधन दरवाढ (Petrol Diesel Price Today) केली. पेट्रोल दरात 30 पैशांची तर डिझेल दरात 35 पैशांची वाढ करण्यात आली आहे. मागील आठवडाभरात पेट्रोल दरात एकूण 4 रुपयांची तर डिझेल दरात 4.10 रुपयांची वाढ झालेली आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आल्यानंतर तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढीला सुरुवात करण्यात आली होती. तत्पुर्वी सुमारे साडेचार महिने इंधन दर स्थिर ठेवण्यात आले होते. रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान सुरु असलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारात क्रूड तेलाचे दर कडाडले आहेत. या दरवाढीमुळे इंधन दरवाढ करावी लागत असल्याचे तेल कंपन्यांचे म्हणणे आहे.
ताज्या दरवाढीनंतर (Petrol Diesel Price Today) देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे प्रति लीटरचे दर 99.41 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे डिझेलचे दर 90.42 रुपयांवर गेले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल 114.19 तर डिझेल 98.50 रुपयांवर गेले आहे. तामिळनाडूतील येथे हेच दर क्रमशः 105.18 आणि 95.33 रुपयांवर तर प. बंगालमधील कोलकाता हे दर क्रमशः 108.85 आणि 93.92 रुपयांवर गेले आहेत.
हे ही वाचा :
- प्रमोद सावंत यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, सलग दुसऱ्यांदा बहुमान
- Oscars 2022 : ऑस्कर सोहळ्यात राडा; बायकोच्या टकलावर मस्करी केल्यानंतर भडकला विल स्मिथ, निवेदकाच्या कानाखाली लगावली