नाशिक : हार्डवेअरच्या दुकानात चोरट्याचा डल्ला ; 6 लाखांची रोकड, लॅपटॉप चोरीला | पुढारी

नाशिक : हार्डवेअरच्या दुकानात चोरट्याचा डल्ला ; 6 लाखांची रोकड, लॅपटॉप चोरीला

नाशिक (सुरगाणा) पुढारी वृत्तसेवा ; येथील सुरगाणा – उंबरठाण रस्त्यालगत असलेल्या हरि ओम सिमेंट व हार्डवेअर दुकानात सहा लाख रूपयांची चोरी झाली आहे. गेल्या काही दिवसांत सुरगाणा शहरात चोरीचे प्रमाण वाढले असून नुकत्याच पार पडलेल्या होळी यात्रेत महिलांचे मंगळसूत्र लांबविण्याचा प्रकार घडला होता. यापूर्वी येथील एका फर्निचर व काही किराणा दुकानात शिरून चोरी झाली आहे.

येथील चोरीचे सत्र सुरूच असून रविवारी (दि.२०) रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान येथील हरि ओम सिमेंट एजन्सी मध्ये मागील बाजूने अज्ञात चोरट्याने प्रवेश करून ड्रॉवरमध्ये ठेवलेली ५ लाख ८७ हजार रुपयांची रोकड व १५ हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप अशी तब्बल ६ लाख २ हजार रूपयांची चोरी झाली. आत प्रवेश करण्यापूर्वी अज्ञात चोरट्याने बाहेरील बाजूस असलेले सीसीटीव्ही कॅमेरे फिरवून दिले होते. मात्र दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-यात चोरी करतानांची हालचाल कैद झाली आहे.

चेहरा झाकला असल्याने ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याठिकाणी आलेल्या ठसे तज्ज्ञांना दोन ठसे मिळाले असल्याचे सांगण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड यांनी भेट देऊन माहिती घेत आवश्यक सुचना केल्या. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे करत आहेत.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट

Back to top button