राकेश अस्थाना दिल्ली पोलिस आयुक्तपदी, 'बीएसएफ'चा अतिरिक्‍त पदभार देवसाल यांच्‍याकडे | पुढारी

राकेश अस्थाना दिल्ली पोलिस आयुक्तपदी, 'बीएसएफ'चा अतिरिक्‍त पदभार देवसाल यांच्‍याकडे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिस दलात मोठा बदल केला आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांची दिल्ली पोलिस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. राकेश अस्थाना हे १९८४ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

अस्थाना हे सीमा सुरक्षा दलाचे संचालक होते. त्यांची दिल्ली पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर आयटीबीपीचे महासंचालक एस. एस. देवसाल यांच्याकडे सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

गुजरात कॅडरचे अधिकारी असलेल्या अस्थाना यांच्या निवृत्तीच्या तीन वर्षे आधी ही जबाबदारी देण्यात आली आहे. यूटी कॅडरचे एन. एन. श्रीवास्तव ३० जूनला दिल्ली पोलिस आयुक्तपदावरून नियुक्त झाले होते. यानंतर बालाजी श्रीवास्तव यांना दिल्लीचे आयुक्त करण्यात आले होते.

महत्त्वाचे म्हणजे दिल्लीत १९ वर्षांनंतर यूटी कॅडरच्या बाहेरील अधिकाऱ्याला सर्वोच्च पदावर स्थान दिले गेले आहे. यापूर्वी १९९६ मध्ये आयपीएस अधिकारी अजय शर्मा यांना ही संधी मिळाली होती.

उत्तर प्रदेश कॅडर असतानाही अजय शर्मा याना जुलै १९९९ मध्ये दिल्ली पोलिस आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले होते. ते जून २००२ पर्यंत पदावर होते. दरम्यान, राकेश अस्थाना हे नेहमी आपल्या कामामुळे आपल्या कृतीमुळे चर्चेत राहिले आहेत.

अस्थाना सीबीआयचे विशेष संचालक देखील होते. त्यावेळी तत्कालीन सीबीआय संचालक अलोक वर्मा यांच्याशी झालेल्या वादामुळे त्यांची बदली करण्यात आली होती.

अस्थाना हे सीबीआयचे विशेष संचालक आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालक होते. सीबीआयमध्ये नियुक्ती वेळी तत्कालीन संचालक अलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता. दोघांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. विशेष म्हणजे अलोक वर्माही आधी दिल्लीचे पोलिस आयुक्त होते.

इशरत जहांप्रकरणातील आरोपांमुळे अस्थाना चर्चेत

गुजरातवमधील इशरत जहां चकमक प्रकरणी राकेश अस्थाना यांनी फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाऱ्याला पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी भाग पाडले होते.

असा आरोप गुजरात कॅडरमधील आयपीएस अधिकारी सतीश वर्मा यांनी गुजरात हायकोर्टात याचिका दाखल करून केला होता.

सखोल चौकशी करणारे अधिकारी अशी वर्मा यांची ओळख होती.

हे ही वाचलं का ?

पाहा व्‍हिडीओ :बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरु…

Back to top button