सोन्याच्या दरात घट! सोन्याचा भाव ठरवतं कोण? | पुढारी

सोन्याच्या दरात घट! सोन्याचा भाव ठरवतं कोण?

मुंबई, पुढारी ऑनलाईन : मागील दिवसांपासून सोन्याच्या दरात अस्थिरता आलेली आहे. सोन्याच्या दरामध्ये कधी वाढ होते, तर कधी घट होत आहे. मंगळवारीदेखील सोन्याचे घसरले. २०२० साली सोन्याच्या दराने तब्बल ५६ हजारांपर्यंत गेलेला होता.

यंदा सोन्याच्या दरात सुमारे ८ हजार ५३० रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी सोन्याचे दर प्रति ग्रॉम २२५ रूपयांनी स्वस्त झाले. मंगळवारी २४ कॅरेट सोन्यासाठी ४७ हजार ७२४ रुपये ग्राहकांना मोजावे लागले.

इंडिया बुलियन एण्ड ज्वेलर्स असोसिएशनद्वारे जारी केलेल्या ताज्या आकड्यांनुसार २३ कॅरेट सोन्याचे दर ४७ हजार ५३३ रूपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ४३ हजार ७१५ रूपये प्रति १० ग्रॉम आहे. या दरांमध्ये प्रत्येक शहरात ५०० ते १००० रुपयांचा फरक असणार आहे.

दिल्लीत सोन्याचे दर १२३ रुपयांनी तर, चांदीचे दर २०६ रुपयांना घसरले आहेत. दिल्लीचा सराफ बाजारात मंगळवारी सोन्याचे दर ४६ हजार ५०५ रुपये होते. मुंबईत देखील सोन्याचे दर १० ग्रॅम २१० रुपयांनी घसरून ४६ हजार ६६० रुपयांवर पोहोचले आहेत. गोल्ड रिटर्न संकेतस्थळावरील माहितीनुसार चेन्नईमध्ये सोन्याचे दर १० ग्रॅम ४५ हजार ०४० रुपये आहे.

Gold jewellery

सोन्याचा भाव कोण ठरवतं?

माणसाच्या आयुष्यातील सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे सोनं आहे. तर, या सोन्याचे दर ठरवतं कोण, हा प्रश्न नेहमीच तुम्हालाही पडला असेल. खास बात अशी की, जगातील कोणतंही सरकार सोन्याचा दर ठरवत नाही. ते ठरविण्यासाठी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया नाही.

सोन्यचा दर केवळ हा आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. १९१९ मध्ये लंडनमधील ५ मोठ्या बुलियन ट्रेडर्स एकत्र आले आणि त्यांनी सोन्याचा भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. सोन्याच्या दरात निर्णय घेण्यात येऊ लागले. त्यावेळी लंडनमध्ये ब्रिटिशांची सत्ता होती.

त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. त्यावेळी सोन्याचा पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं विकलं जात होतं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरुपात ठरवण्यात आला.

पहा व्हिडीओ : कोयनेतून येणारं पाणी लाल का आहे?

Back to top button