Covid 19 India : कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ! | पुढारी

Covid 19 India : कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : Covid 19 India देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य वाढ नोंदवण्यात आली आहे.

गेल्या एका दिवसात ४३ हजार ६५४ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, ४१ हजार ६७८ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली.

दरम्यान ६४० रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. देशातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या त्यामुळे ३ कोटी ६ लाख ६३ हजार १४७ पर्यंत पोहचली आहे.

अधिक वाचा :

३ लाख ९९ हजार ४३६ रूग्णांवर (१.२७ टक्के) उपचार सुरू आहे. दुदैवाने आतापर्यंत ४ लाख २२ हजार २२ रूग्णांचा (१.३४ टक्के) कोरोना बळी घेतला.

बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९७.३९ टक्के नोंदवण्यात आला.

गेल्या एका दिवसात सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत १ हजार ३३६ ने वाढ नोंदवण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानूसार गेल्या एका दिवसात केरळमध्ये सर्वाधिक २२ हजार १२९ कोरोनाग्रस्त आढळले.

केरळपाठोपाठ महाराष्ट्र ६,२५८, तामिळनाडू १,७६७, ओडिशा १,६२९ तसेच आंध्रप्रदेशात १ हजार ५४० कोरोनाबाधितांची भर पडली.

देशात लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत लशींचे ४४ कोटी ६१ लाख ५६ हजार ६५९ डोस लावण्यात आले आहेत. यातील ४० लाख २ हजार ३५८ डोस मंगळवारी लावण्यात आले.

अधिक वाचा :

कोरोना तपासण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. आतापर्यंत ४६ कोटी ९ लाख ९७८ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत.

यातील १७ लाख ३६ हजार ८५७ तपासण्या मंगळवारी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांकडे सध्यस्थितीत लशींचे २ कोटी १८ लाख १० हजार ४२२ डोस शिल्लक आहेत.

अधिक वाचा :

केंद्राकडून आतापर्यंत ४६ कोटी २३ लाख २७ हजार ५३० डोस पुरवण्यात आले आहेत. यातील ४४ कोटी २९ लाख ९५ हजार ७८० डोस चा वापर करण्यात आला आहे.

तर, येत्या काळात १ कोटी २० लाख ७० हजार ८२० डोस राज्य, केंद्रशासित प्रदेशांना पुरवले जातील.

देशातील संपुर्ण लसीकरणाची स्थिती

 

श्रेणी संपुर्ण : लसीकरण

१) आरोग्य कर्मचारी : ७७,५३,००२
२) फ्रंटलाईन वर्कर्स : १,१०,२०,०८०
३) १८ ते ४४ वयोगट : ६८,८६,१८८
४) ४५ ते ५९ वयोगट : ३,६२,४२,६५५
५) ६० वर्षांहून अधिक : ३,४९,३०,६७३

अधिक वाचा :

Back to top button