दिलीप कुमारांनी घडवली हाेती यशपाल शर्मा यांची क्रिकेट कारकीर्द | पुढारी

दिलीप कुमारांनी घडवली हाेती यशपाल शर्मा यांची क्रिकेट कारकीर्द

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन :  माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे आज निधन झाले. खूप कमी जणांना माहित असेल की, यशपाल शर्मा यांची क्रिकेट कारकीर्द ही ज्‍येष्‍ठ अभिनेते दिलीप कुमारांनी घडवली हाेती.

अधिक वाचा

१९८३च्‍या क्रिकेट विश्‍वचषक विजेता संघात ते होते. संपूर्ण स्‍पर्धेत त्‍यांनी अविस्‍मरणीय खेळी केली होती. विश्‍वचषक जिंकण्‍यामध्‍ये त्‍यांनी बहुमूल्‍य योगदान दिले. या स्‍पर्धेत इंग्‍लंडविरोधातील उपांत्‍य सामान्‍यात त्‍यांनी अर्धशतकी खेळी केली होती. क्रिकेटमधून निवृत्त झाल्‍यानंतर ते भारताच्‍या राष्‍ट्रीय क्रिकेट संघाचे निवड सदस्‍यही होते.

अधिक वाचा

आवडते अभिनेते होते दिलीपकुमार

यशपाल हे आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटपटू होण्‍यात अभिनेते दिलीपकुमार यांचे मोठे योगदान होते. याचा खुलासा खुद्‍द यशपाल यांनीच एका मुलाखतीमध्‍ये केला होता. माझे क्रिकेटमध्‍ये करियर घडविण्‍यात दिलीपकुमार यांचे माेलाचे योगदान होते. त्‍यामुळे मी जिवंत असे पर्यंत माझे आवडते अभिनेते दिलीपकुमार असतील, असेही ते म्‍हणाले हाेते.

दिलीप कुमार

दिलीपकुमारांनी केली होती यशपाल यांच्‍या नावाची शिफारस
दिलीपकुमार हे पंजाबला गेले होते. येथे रणजी ट्रॉफीचा सामना सुरु होता. तो पाहण्‍यासाठी दिलीपकुमार गेले. यावेळी यशपाल शर्मा यांची फलंदाजी दिलीप कुमार यांना खूपच भावली.यानंतर यशपाल यांनी दिलीप कुमार यांची भेट घेतली होती.

‘तू खूप चांगली फलंदाजी केलीस. मी तुझ्‍या बद्‍दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय ) बोललो आहे’, असे दिलीप कुमार यांनी यशपाल यांनी सांगितले होते.

यावेळी दिलीप कुमार यांनी बीसीसीआयचे अधिकारी राजसिंह डूंगरपूर यांच्‍याशी यशपाल यांच्‍या खेळीबाबत चर्चा केली होती. त्‍यामुळे यशपाल हे नेहमीच दिलीप कुमार यांच्‍याबद्‍दल कृतज्ञता व्‍य्‍कत करत असत.

हेही वाचलं का?

 

पहा व्‍हिडिओ : गरीब मुलांच्‍या चेहर्‍यावर हसू फुलवणारा जाेकर

Back to top button