IND vs SA : विराट कोहलीने सचिन तेंडूलकरचा मोठा विक्रम मोडला!

IND vs SA : विराट कोहलीने सचिन तेंडूलकरचा मोठा विक्रम मोडला!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना पार्ल मैदानावर खेळला जात आहे. कसोटी मालिका गमावलेल्या भारतीय संघाकडून वनडे मालिकेत चांगली कामगिरी अपेक्षित आहे. चला जाणून घेऊया या सामन्यात कोणते मोठे विक्रम होऊ शकतात.

कोहली सचिन तेंडूलकरला मागे टाकले…

विराट कोहलीने (Virat Kohli) पार्ल एकदिवसीय सामन्यात 9 धावा काढल्यानंतर तो टीम इंडियासाठी भारताबाहेर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. यापूर्वी त्याने भारताबाहेर खेळताना 107 सामन्यात 5057 धावा केल्या होत्या. तर सचिन तेंडुलकर (5065) धावा केल्या आहेत. आज द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत राहुल बाद झाल्यानंतर कोहली दुस-या क्रमांकावर खेळण्यासाठी आला. त्याने 9 धावा करताच तो सचिन तेंडूलकरच्या पुढे गेला.

एवढेच नाही तर कोहलीने 27 धावांचा टप्पा गाठल्यानंतर तो आफ्रिकेविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा सचिन तेंडुलकर (2001) नंतरचा दुसरा भारतीय ठरेला. विराटने आतापर्यंत (1287) धावा केल्या होत्या. आज त्याने 27 धावा करताच सौरव गांगुली (1313) आणि राहुल द्रविड (1309) यांच्या पुढे गेला.

कोहलीच्या 71 व्या शतकाची उत्सुकता….

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतके झळकावली आहेत. जर कोहलीने द. आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले, तर तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत तो रिकी पाँटिंगशी (71) बरोबरी साधेल. सचिन तेंडुलकरच्या नावावर 100 शतकांची नोंद आहे.

चहलला विकेटच्या शतकाची संधी…

युझवेंद्र चहलने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 3 विकेट घेतल्यास तो या फॉरमॅटमध्ये 100 विकेट पूर्ण करेल. टीम इंडियासाठी 100 एकदिवसीय विकेट घेणारा चहल हा 24 वा खेळाडू ठरणार आहे. तसेच, त्याने 3 विकेट घेतल्यास, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 बळी घेणारा भारताचा तिसरा गोलंदाज बनेल. चहलने आतापर्यंत 56 एकदिवसीय सामन्यांमध्ये 97 बळी घेतले आहेत. युझवेंद्र चहलने पहिल्या सामन्यात दोनही विकेट घेतल्यास तो आफ्रिकेत वनडेत सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनेल. चहलच्या नावावर आफ्रिकेत 16 विकेट असून सध्या कुलदीप यादव 17 विकेटच्या जोरावर पहिल्या क्रमांकावर आहे.

सामन्यातील रंजक बाबी…

केएल राहुल एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार होणारा भारताचा 26 वा खेळाडू असेल.

जसप्रीत बुमराहचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 150 वा सामना असेल.

या सामन्यात डेव्हिड मिलरने 2 चौकार मारले तर तो वनडेत 250 चौकार पूर्ण करेल.

शिखर धवन (2488) या सामन्यात 12 धावांसह भारताबाहेर 2500 धावा पूर्ण करेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news