Anushka Sharma : विराटच्या पांढऱ्या दाढीवरून अनुष्काची पोस्ट होतेय व्हायरल | पुढारी

Anushka Sharma : विराटच्या पांढऱ्या दाढीवरून अनुष्काची पोस्ट होतेय व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीने भारताच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासानंतर विराटची पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) रविवारी यावर प्रतिक्रिया दिली. अनुष्काने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये अनुष्काने २०१४ मधील तो दिवस आठवला. जेव्हा विराट कोहलीला एमएस धोनीकडून कर्णधारपद सोपवण्यात आले होते. ते तिघे एकत्र कसे बसले आणि गप्पा मारल्या हे अनुष्का पुढे सांगते.

“मला २०१४ मधील तो दिवस आठवतो जेव्हा तू मला सांगितले की, तुला कर्णधार बनवण्यात आले आहे. कारण एमएसने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. मला आठवतंय एमएस, तू आणि मी त्या दिवशी खूप गप्पा मारल्या होत्या. तो तुझी दाढी किती लवकर पांढरी होऊ लागेल याची गंमत करत होता. त्यावर सर्व जण मनसोक्त हसले. त्या दिवसापासून, मी तुझी दाढी पांढरी झालेली पाहिली आहे. ”(Anushka Sharma)

एमएस धोनीकडून नेतृत्वाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तिने तिच्या पतीमध्ये झालेले बदल मान्य केले. “मी हे बदल पाहिले आहेत. हा बदल अफाट आहे. आणि हो, भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून तुझी झालेली प्रगती आणि तुझ्या नेतृत्वाखाली संघाने कोणती कामगिरी केली, याचा मला खूप अभिमान आहे. पण तुझ्यात झालेल्या बदलाचा मला अभिमान आहे,” असं तिने म्हटले आहे. (Anushka Sharma)

हेही वाचलत का?

Back to top button