Novak Djokovic : लस टाळणारा जोकोविच, कोरोनाचे औषध बनवणाऱ्या एका कंपनीचा मालक! | पुढारी

Novak Djokovic : लस टाळणारा जोकोविच, कोरोनाचे औषध बनवणाऱ्या एका कंपनीचा मालक!

पुढारी ऑनलाईन डेस्क : (Novak Djokovic) ऑस्ट्रेलियाने नुकतीच जगातील नंबर एकचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याच्‍यावर  तीन वर्षांसाठी बंदी घातली. कोरोनाची लस न घेतल्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्‍यात आली आहे. आता वेगळीच एक माहिती समोर आली आहे. यामुळे पुन्हा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच पुन्‍हा चर्चेत आलायं. नोव्हाक जोकोविच याचे एका कोरोनावरील औषध बनवणाऱ्या फर्मासिस्ट कंपनीत ८० टक्के भागीदारी असल्याची बाब समोर आली आहे.

(Novak Djokovic) डॅनिश फार्मास्युटिकल कंपनीत जोकोविचची ८० टक्के भागीदारी असल्याचे वृत्त आहे. ताे या कंपनीचे
सह-संस्थापक देखील आहेत. QuantBioRes नावाची ही कंपनी कोरोनाशी लढण्यासाठी औषध बनवत आहे. याचा खुलासा खुद्द कंपनीच्या सीईओने केलायं.

सीईओ इव्हान लोनकारेविच यांनी जोकोविचच्या स्टेकबाबत माहिती दिली. त्‍यांनी सांगितले की, नोव्हेंबर २०२० पासून त्यांचे जोकोविचबराेबर संवाद झालेला नाही. क्वांटबायोरेस नावाच्या या कंपनीत ११ संशोधक आहेत. ते डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया आणि स्लोव्हेनियामध्ये काम करत आहेत. इव्हान लोन्कारेविच यांनी सांगितले की, ही कंपनी कोरोनावर उपचार करण्यासाठी औषध बनवत आहे. कंपनी याच वर्षी ब्रिटनमध्ये क्लिनीकल ट्रायल घेऊ शकते. नोव्हाक जोकोविच याच्याकडून याविषयी कोणतीही प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही.

काही दिवासांपूर्वी नोव्हाक जोकोविच वादात आला होता. २० वेळा ग्रँडस्लॅम विजेत्याचा व्हिसा ऑस्ट्रेलियन सरकारने रद्द केला आहे. कोरोना  लस न घेताचत जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भाग घेण्यासाठी गेला होता.  त्याला ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्सने डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवले होते. त्यानंतर जोकोविचच्या वकिलाने न्यायालयात दाद मागितली. कोर्टाने जोकोविचला सोडण्याचे आदेश दिले.(Novak Djokovic)

यानंतर जोकोविच (Novak Djokovic) प्रॅक्टिस करत असल्याचा दिसला होता. त्याला ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ मध्ये पहिले मानांकन देखील देण्यात आले होते; पण नंतर अस समोर आले की, जोकोविचने फॉर्ममध्ये चुकीची ट्रॅव्हल इतिहास आणि कोरोना झाल्याचेही लपवले होते. इतकेच नाही तर कोरोनाची लागण होऊनही जोकोविचने एका फ्रेंच वृत्तपत्राला मुलाखत दिली. या खुलाशानंतर जोकोविचच्या या बेजबाबदार कृत्यावर चौफेर टीका झाली होती.

ऑस्ट्रेलियाचे इमिग्रेशन मंत्री ॲलेक्स हॉक यांनी नंतर दुसऱ्यांदा जोकोविचचा व्हिसा रद्द केला. त्यामुळे नऊ वेळच्या ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियनला ऑस्ट्रेलियातून परतावे लागले. आता त्‍याने लस घेतली नाही तर त्याला फ्रेंच ओपनमध्ये सहभागी होता येणार नाही.
(Novak Djokovic)

हेही वाचलंत का?

</

p>

Back to top button