Jai Bhim : आणखी एक विक्रम ‘जय भीम’च्या नावे | पुढारी

Jai Bhim : आणखी एक विक्रम ‘जय भीम’च्या नावे

पुढारी ऑनलाईन

गतवर्षी प्रदर्शित झालेल्या ‘जय भीम’ (Jai Bhim) चित्रपटाने आता आणखी एक विक्रम स्वतःच्या नावे केला आहे. दिग्दर्शक टी. जे. ज्ञानवेल आणि दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याच्या या चित्रपटाने मानाच्या ऑस्कर पुरस्काराच्या यूट्यूब चॅनेलवर स्थान मिळवले आहे. या चित्रपटाला अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्डच्या यूट्यूब चॅनेलवर स्थान देण्यात आले आहे. ‘जय भीम’ असा सन्मान मिळवणारा पहिलाच तमिळ चित्रपट ठरला आहे. यापूर्वी चित्रपटाने ‘गोल्डन ग्लोब 2022’च्या बेस्ट नॉन इंग्लिश फिल्म कॅटेगरीत अधिकृत एन्ट्री मिळवली आहे. याशिवाय आयएमडीबीवरही या चित्रपटाचे रेटिंग 10 पैकी 9.6 आहे. चित्रपटात सूर्याने चंद्रू या वकिलाची भूमिका साकारली आहे. 1993 मधील सत्य घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. (Jai Bhim)

Back to top button